विमानातील अनेक घटना सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. अनेकदा विमानात मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना घडत असतात. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. हिवाळ्याच्या हंगामात खराब वातावरणामुळे अनेक वेळा विमान उड्डाणे करण्यास उशीर होतो आणि काही प्रकरणांमध्ये ते रद्द देखील केले जातात. कधी खराब हवामानामुळे तर कधी तांत्रिक कारणाने अनेकदा फ्लाइटला उशीर होतो. मात्र विमानाच्या इंजिनमध्ये एका प्रवाशानं नाणं टाकल्यामुळे फ्लाइटला उशीर झाल्यातचे तुम्ही कधी ऐकले का? पण असं घडलय. एका नाण्यामुळे विमान तब्बल ४ तास खोळंबलं होतं.
६ मार्च रोजी सान्याहून बीजिंगला जाणारे चायना सदर्न एअरलाइन्सचे विमानात ही घटना घडली. हे विमान सकाळी १० टेक ऑफ करणार होते. मात्र एका विचित्र घटनेमुळे विमान तब्बल ४ तास उशीराने उडाले. विमान उड्डाणाच्या विलंबाचे कारण खूप वेळानंतर समोर आले. एका फुटेजमध्ये एका प्रवाशानं फ्लाइट अटेंडंटला नाणी फेकल्याचा संशय आला, यानंतर त्याची चौकशी केली असता प्रवाशाने “तीन ते पाच” नाणी टाकल्याचे कबूल केले.
आपण करीत असलेल्या कामाला सुरुवात करताना त्यामध्ये आपल्याला यश मिळावे म्हणून नारळ फोडणे, किंवा एखादी व्यक्ती प्रवासाला निघाली की तिचा प्रवास बिनदिक्कत पार पडावा या करिता तिच्या हातावर दही देणे, या आणि अशा अनेक गोष्टींची परंपरा आपल्याकडे शतकानुशतके सुरु आहे. चीनमध्ये ‘गुडलक’ किंवा शुभ शकून म्हणून नाणे टाकण्याची परंपरा रूढ आहे. मात्र एका चीनी प्रवाश्याने गुड लक साठी टाकलेले नाणे, त्याच्यासाठी ‘अनलकी’ ठरले असून, त्याची रवानगी चक्क तुरुंगामध्ये करण्यात आली आहे.
‘गुडलक’साठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये फेकली नाणी
या प्रवाश्याने गुड लक साठी टाकलेली नाणी रस्त्यावर किंवा पाण्यामध्ये टाकली नसून, चक्क विमानाच्या चालू इंजिनमध्ये टाकली. त्यामुळे अर्थातच विमानाच्या इंजिनमध्ये होऊ शकणारे संभाव्य बिघाड लक्षात घेऊन या फ्लाईटला विलंब झाला. याने विमान कंपनीचे नुकसान तर झालेच, पण त्याशिवाय या विमानाने प्रवास करणार असलेल्या सर्व प्रवाश्यांचाही चांगलाच खोळंबा झाला.
हेही वाचा >> VIDEO: काका जरा दमानं! हायवेवर सुसाट गाडीवर हात सोडले अन् मग…थरारक घटना व्हायरल
विमानाचा प्रवास सुरक्षित पार पडावा यासाठी प्रवाश्यांनी विमानाच्या इंजिनमध्ये नाणी फेकण्याचा हा पहिलाच प्रसंग नसून, या पूर्वीही २०१७ साली एका ऐंशी वर्षीय वृद्ध प्रवाश्याने शांघाई येथून प्रस्थान करणाऱ्या विमानामध्ये नाणी फेकण्याचा ‘पराक्रम’ केल्याने त्यामुळे प्रवाश्यांना अनेक तास विमानतळावरच मुक्काम करावा लागला होता.