ब्रिटनच्या साऊथ हॅप्टन येथून न्युयॉर्कला जाण्यासाठी निघालेले टायटॅनिक जहाजाची ‘कधीही न बुडणारे जहाज’ म्हणून ख्याती होती. पण, पहिल्याच प्रवासात दीड हजारांहून अधिक प्रवाश्यांना घेऊन या महाकाय जहाजाने जलसमाधी घेतली. आज या घटनेला १०४ वर्षे उलटली. आजही टाटानिक या जहाजाबद्दल अनेक कथा ऐकिवात आहे. हे जहाज, त्याची भव्यता आणि आलिशानता पाहण्याची संधी पुन्हा एकदा जगाला मिळणार आहे. कारण चीनमध्ये ‘टायटॅनिक’ची हुबेहुब प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
वाचा : स्केटिंग रिंग बनवण्यासाठी ५ हजार माशांना गोठवले
१५ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक समुद्रात बुडाले. व्हाइट स्टार लाइन कंपनीचे हे ५२ हजार टन वजनी जहाज १० एप्रिलला इंग्लंडमधील साऊथ हॅप्टनमधून न्यूयॉर्कच्या दिशेने निघाले होते. टायटॅनिकची ही पहिलीच सफर होती. पण हे जहाज कधीच न्यूयॉर्कला पोहचले नाही. १४ एप्रिलला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागराच्या विशाल हिमनगावर ते आदळले. त्यानंतर अवघ्या २ तास ४० मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन त्याने जलसमाधी घेतली. पुढे जेम्स कॅमरुन या दिग्दर्शकाने टायटॅनिकचा प्रवास मोठ्या पडद्यावर आणला. हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता लिओनार्दो दीकेप्रिओ आणि केट या दोघांनी हा संपूर्ण प्रवास जीवंत करत टायटॅनिकची दु:खद काहाणी जगासमोर प्रकर्षाने मांडली.
याच आलिशान जहालाची भव्यता आणि आलिशानता जगाला पुन्हा एकदा अनुभवता यावी यासाठी चीनमध्ये टायटॅनिकच्या बांधणीचे काम सुरू झाले आहे. गेल्याच आठवड्यात या कामाला सुरुवात झाली आहे. शिचॉन प्रांतात या जहाजीची प्रतिकृती उभारली जाणार असून त्याच्या बांधणीच्या कामाला कालपासून सुरूवात झाली आहे. टायटॅनिकची प्रतिकृती उभारण्यासाठी जवळपास ११६ मिलिअन डॉलर इतका खर्च येणार आहे. हे जहाज शिचॉन प्रांतातल्या क्वी नदीत कायस्वरूपी ठेवण्यात येणार आहे. २०१७ च्या शेवटापर्यंत या जहाजाची बांधणी पूर्ण होणार आहे. टायटॅनिक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या जहाजाही बांधणी होणार आहे. यातल्या प्रत्येक खोली त्यांचे फर्निचर, इंटिरिअर हे सगळेच टायटॅनिक सारखेच असणार आहे. इतकेच नाही तर १९१२ साली टायटॅनिकच्या मेन्यू कार्डवर ज्या पदार्थांची यादी दिली होती ते पदार्थ येथेही पर्यटकानां देण्यात येणार आहे. चीनच्या पर्यटनाच्या दृष्टीने हा प्रकल्प खूप महत्त्वाचे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ज्याच्या आलीशानतेच्या, भव्यतेच्या इतक्या कथा ऐकिवात आहे ते जहाज प्रत्यक्षात पाहायला कधी मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
Viral Video : तरुणांवर चढली ‘त्या’ चहावाल्याच्या गाण्याची झिंग