Chinese Rocket Out Of Control In Space : चीनमधून फैलावलेल्या करोना संकटाचे चटके संपूर्ण जग आजही सोसत आहेत. आता कुठे करोना नावाचं संकट थांबण्याचं नाव घेत असताना चीन देश मात्र संकटाची मालिका सुरूच ठेवतंय. त्याचे परिणाम इतर देशांनाही भोगावे लागत आहेत. करोनानंतर चीनच्या आणखी एका संकटामुळे भारतीयांवर मोठी आपत्ती निर्माण होता होता राहिली. २४ जुलै रोजी चीनने अवकाशात सोडलेलं एक रॉकेट आऊट ऑफ कंट्रोल झाल्यामुळे गेल्या शनिवारी ते पृथ्वीवर कोसळणार होतं. या रॉकेटचं वजन तब्बल २३ मेट्रिक टन इतकं होतं. पण सुदैवाने हे रॉकेट लोकांचा वावर असलेल्या देशात पडले नसून ते महासागरात जाऊन कोसळले. त्यामुळे या आस्मानी संकटात जास्त नुकसान झालं नाही.

चीनच्या लाँग मार्च 5B रॉकेटचा अवशेष शनिवारी संध्याकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार होता. वातावरणाच्या घर्षणामुळे बहुतेक ढिगारा आधीच जळून जाणार होता. २५ टन वजनाचे रॉकेट २४ रोजी चीनच्या अपूर्ण टियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर वेंटियन प्रयोगशाळा केबिन मॉड्यूल वितरित करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, या रॉकेटचा अवशेष ३० जुलै रोजी संध्याकाळी ७.२४ वाजता पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल. रविवारी सकाळी याचा काही ढिगारा कोसळू शकतो, असंही चीनने सांगितलं होतं. शनिवारी चीनचे एक रॉकेट भारताच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरात कोसळले. नासाचे म्हणणे आहे की चीनने या रॉकेटशी संबंधित माहिती दिली नव्हती, ते पृथ्वीवर कुठे पडू शकते हे देखील सांगण्यात आले नव्हते.

आणखी वाचा : शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करणारा हा कुत्रा रातोरात स्टार बनला, पाहा VIRAL VIDEO

एबीसी न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यूएस स्पेस कमांडने सांगितले की, लाँग मार्च 5बी रॉकेटने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला आणि हिंदी महासागरात कोसळला. चीनच्या रॉकेटचा ढिगारा पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याची शक्यता आणि त्याचा ढिगारा कोसळण्याबाबत कमांडने प्रश्न उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दोरीत फसलेला व्हेल मासा मदत मागण्यासाठी मच्छीमाऱ्यांकडे आला, ‘या’ स्टाईलमध्ये ‘धन्यवाद’ म्हणाला!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कर्माचे फळ किती लवकर मिळते? गाढवाला लाथा-बुक्क्यांनी मारणाऱ्या व्यक्तीचा हा VIRAL VIDEO तुम्हाला सांगेल

सोशल मीडियावर चिनी रॉकेटचा ढिगारा पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून यात कुचिंगमध्ये उल्का दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये चीनी रॉकेटचा ढिगारा कशा पद्धतीने कोसळला, हे पाहता येईल. नासाचे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की अंतराळाशी संबंधित कार्य करणार्‍या सर्व देशांनी आधीपासूनच स्थापित केलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन केले पाहिजे आणि जे काही घडते त्याबद्दल माहिती दिली गेली केली पाहिजे.

Story img Loader