आजकाल सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. प्राथमिक शाळेत जाणारी छोटी मुलं शाळेच्या बाकावर झोपलेली दिसत आहे. वर्गात मुलांना असे झोपलेले पाहून आपल्याला आश्चर्य वाटले असेल. कारण आपल्या इथल्या शाळांत जर का कोणी असा झोपण्याचा प्रयत्न केलाच तर शिक्षा किंवा शिक्षकांचा ओरडा ठरलेला असतोच त्यामुळे आपल्याला या फोटोंचे अप्रुप वाटणे साहजिकच आहे. पण चीनमधल्या अनेक शाळांमध्ये मुलांना दुपारच्या जेवणानंतर झोपण्याची सक्ती केली जाते.
वाचा : चिमुकलीला नाश्ताही करायला वेळ नाही..!
चीनच्या अनेक शाळांत मध्यान्ह भोजनानंतर प्रत्येक विद्यार्थी वामकुक्षी घेतो. मुलांचे आरोग्य चांगले राहावे तसेच काही वेळ त्यांना आराम मिळावा यासाठी वामकुक्षी सक्तीची असते. ‘व्हुजिआओ’ म्हणून हा प्रकार ओळखला जातो. दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासांची झोप शाळेच्या बाकावर मुलं घेतात.