भारतीय खाद्यसंस्कृती ही समृद्ध आहे. अप्रतिम चव आणि वैविध्यपूर्ण पर्यायामुळे भारतीय खाद्यपदार्थांनी जगभरातील खाद्यप्रेमींना आकर्षित केले आहे. मग ती डाल मखानी असो, पाणीपुरी असो किंवा वडापाव…या स्थानिक खाद्यपदार्थांना अंताराष्ट्रीय पातळीवर खूप लोकप्रियता मिळाली आहे. बऱ्याचदा परदेशी लोक हे खाद्यपदार्थ खातात आणि त्याचे तोंडभरून कौतूक करताना दिसतात. अलीकडेच चीनमधील एका विक्रेता शेनझेनच्या रस्त्यावर अमृतसरी कुलचा विकताना दिसला. सोशल मीडियावर या विक्रेत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. भारतात प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला चायनिज खाद्यपदार्थांचे विक्रेते दिसतात पण चायनामध्ये भारतीय खाद्यपदार्थ रस्त्यावर विकले जात असल्याचे दर्शवणारा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे.
@amritsarisilive ने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विक्रेत्याने पंजाब आणि दिल्लीमध्ये लोकप्रिय अमृतसरी कुलचा तयार करताना दिसतो आहे. व्हिडीओमध्ये हा विक्रेता विक्रेता प्रथम एका टेबलावर तंदरी कुलचा हाताने तयार करताना दिसतो आहे त्यानंतर भारतात जसे रस्त्यावरील विक्रेत्यांप्रमाणे पांरपारिक पद्धतीनुसार भट्टीमध्ये हा कुलचा भाजतो. त्यानंतर ग्राहकांनी गरमा गरम कुलचा विकतो आहे.
व्हिडिओ शेअर कराना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चायनामध्ये शेन्झेनमध्ये “मिळतोय अमृतसरी कुलचा”
व्हायरल व्हिडिओ येथे पाहा
८०,००,०० पेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहे. हा व्हिडिओ अनेक खाद्यप्रेमींना आवडला आहे. एका यूजरने लिहिले, “किती सुंदर! तुमचे अभिनंदन, हे पाहून खूप आनंद झाला.” दुसऱ्याने लिहिले की, “अमृतसरी असल्याने, हा ‘दिल्लीच्या अमृतसरी कुलचापेक्षा अधिक पारंपारिक वाटत आहे.” तिसऱ्याने लिहिले की, “चांदणी चौक टू चायना”
२०१९मध्ये, ब्रिटिश शेफ अँगुस डेनून लंडनच्या रस्त्यावर झालमुरी विकत असलेल्या व्हिडिओने इंटरनेटवर तुफान चर्चा झाली. व्हिडिओमध्ये अनेक लोक त्याच्या स्टॉलवर रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. अनेकजण कागदाच्या शंकूमध्ये डिश सर्व्ह करणाऱ्या शेफचे चित्रीकरण करत आहेत. या व्हिडिओने अमिताभ बच्चन यांचे लक्ष वेधून घेतले होते.