सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम राहीला नाही. रस्त्यावर घडणारी घटना कुणीतरी लपून छपून कॅमेरात कैद करतो आणि इंटरनेटवर व्हायरल करतो. असं असतानाही काही जणांना आपण भर रस्त्यात कसे वागतोय, याचंही भान राहिलेलं नसतं. सध्या पाकिस्तानचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक चिनी महिला रस्त्यात एका पाकिस्तानी महिलेशी भांडताना दिसत आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाकिस्तानी महिला आणि चिनी महिलेमध्ये तुफान हाणामारी झालीय. भर रस्त्यात दोघी एकमेकींना मारताना तर, चिनी महिला पाकिस्तानी महिलेचे केस ओढताना दिसत आहे. दरम्यान आजुबाजूला जमलेली गर्दी या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दोघीही एकायला तयार नाहीत.  त्याचबरोबर हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – IPL फायनलच्या संध्याकाळी स्विगी इंस्टामार्टद्वारे २,४२३ कंडोमची विक्री, कंपनीने केले मजेदार ट्विट

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader