Shocking Viral Video : नवरा बायकोमध्ये अनेकदा वैचारिक मतभेद असतात, काहीवेळा एकमेकांच्या सवयी आवडत नाहीत. यामुळे अनेकदा वाद हातोत, जे आरामात बसून सोडवता येण्यासारखे असतात पण दोघेही तसा प्रयत्न करत नाहीत. अशाने हा वाद वाढतात आणि त्याचा परिणाम मुलांना सहन करावा लागतो. सध्या नवरा- बायकोतील अशाच वादाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बायकोने नवऱ्याबरोबर झालेल्या वादानंतर त्याची शिक्षा थेट मुलांना दिली आहे. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ पाहून आता तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नवऱ्याला त्रास देण्यासाठी बायकोने तिच्या दोन लहान मुलांना २३ व्या मजल्यावरील खिडकीबाहेरील एसी युनिटवर बसवले. यावेळी तिने नवऱ्याला आपल्या मुलांजवळही येऊ देत नाही. त्यामुळे मुलं जोरजोरात रडत होती, ही घटना १० ऑक्टोबर रोजी मध्य चीनच्या हेनान प्रांतातील लुओयांग येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

नवऱ्याबरोबरच्या वादानंतर बायकोने मुलांचा जीव टाकला धोक्यात

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका महिला तिच्या लहान मुलांना प्लॅटच्या खिडकीच्या बाहेरील एसी युनिटवर बसवली आहे. तसेच ती स्वत:देखील खिडकीत बसली आहे. ती मुलांना घेऊन खिडकीत बसून नवऱ्याबरोबर भांडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे, धक्कादायक बाब म्हणजे यावेळी ती २३ व्या मजल्यावर असल्याचे दिसत आहे.

मुलं घाबरुन जोरजोरात रडली , किंचाळली पण…

यावेळी मुलांच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आल्याने ते तात्काळ घरातून बाहेर आले आणि मुलांना या अवस्थेत पाहून घाबरले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक पाठवले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून त्या मुलांना वाचवले. या घटनेदरम्यान काही लोकांनी त्याचा व्हिडिओही बनवला.

या जोडप्यामध्ये नेमका कशामुळे वाद झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक महिला आणि बाल संघटनेच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर या महिलेला शिक्षा होईल की नाही याबाबत काही सांगता येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“माझ्या भावाला मारलंस ना तर…” चिमुकलीने आईशी कचाकचा भांडत दिली धमकी; VIDEO तील निरागसपणा पाहून युजर्स म्हणाले…

अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, “ही अशी कशी आहे? जगातील प्रत्येक आई आपल्या मुलांचे संरक्षण करत असताना, पण या आईने स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात टाकला.” दुसऱ्याने लिहिले – “या महिलेने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे. जर मुलांसोबत कोणतीही घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असते? ही महिला आई म्हणवून घेण्यास योग्य नाही.”