Chinese Zoo Pandas Painted dogs :प्राणीसंग्रहालय अशा जागा आहे जिथे पर्यटक वन्यप्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी जातात. प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी जेरबंद करून ठेवले जातात, त्यांना काय हवे नको त्याची काळजी घेतली जाते. लहान मुलं आणि पर्यटक दुर्मिळ प्राणी पाहण्यासाठी आवर्जून तिथे येतात. नव्या पिढीला प्राण्यांबाबत माहिती व्हावी हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे. पण पांडा म्हणून जर कुत्रा दाखवला जात असेल तर ती पर्यटकांची दिशाभूल आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रकार चिनीमधील प्राणीसंग्रलयात घडला आहे.

चीनमधील शानवेई प्राणीसंग्रहालयातील पर्यटकांना ‘पांडा’ प्रत्यक्षात म्हणून काळ्या-पांढऱ्या रंगवलेले कुत्रे दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
Thailand floods Giant reticulated python spotted in floodwater after eating a dog chilling video goes viral
Thailand floods: पूराच्या पाण्यात आढळला महाकाय अजगर; कुत्र्याला गिळल्याने फुगले त्याचे पोट, पाहा थरारक Viral Video
Monkey hugs Shashi Tharoor, falls asleep on his lap
Shashi Tharoor : माकडानं शशी थरुरांना मिठी मारुन कुशीत काढली एक डुलकी, फोटो व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

‘पांडासारखे रंगवलेल्या कुत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक कुंपणाच्या परिसरात खडकावर थकलेल्या अवस्थेत एक पांडासारखा काळ्या पांढर्‍या रंगाने रंगवलेला कुत्रा झोपलेला दिसत आहे. तर वाकडी शेपटी असलेला आणखी एक ‘ रंगवलेला पांडा’ बंदिस्त जेलमध्ये फेरफटका मारताना दिसत आहे.

हेही वाचा – “बाईsss….हा काय प्रकार?” दारुच्या नशेत व्यक्तीने थेट सापाबरोबर घेतला पंगा, पुढे काय घडले ते Viral Videoमध्ये पाहा

येथे पाहा Video

अशी झाले पोलखोल

“जेव्हा हे पांडा सारखे रंगवलेले कुत्रे भुंकू लागले तेव्हा उपस्थित प्राणीप्रेमींना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले.”,असे न्यूयॉर्क पोस्टने स्थानिक माध्यमांचा हवाला देत वृत्त दिले.

भांड फुटले तरी केला खोटा दावा शेवटी दिली कबुली

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, शानवेई प्राणीसंग्रहालयाने सुरुवातीला असा दावा केला होता की ते “पांडा कुत्र्यांची नवी प्रजाती आहे. पण शेवटी त्यांनी कबूल केले की, त्यांनी फक्त दोन चाऊ चाऊ पांडासारखे रंगवले होते . चाऊ चाऊ हा मूळतः उत्तर चीनमधील कुत्र्यांच्या जातीचा स्पिट्झ प्रकार आहे असे न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे.

हेही वाचा –पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या आजींचा नवा Video चर्चेत, “बुगडी माझी सांडली गं”गाण्यावर सादर केली लावणी

सत्य उघड झाल्यानंतर नाराज पर्यटकांनी शानवेई प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे पैसे परत करण्यास सांगितले आहे

Story img Loader