न कळत्या वयातील लहान मुलांची काळजी घेणं हे आवश्यक असतं, त्याकडे जराही दुर्लक्ष झाल्यास ते जीवावर बेतू शकतं. बालवयात अनेक गोष्टींची उत्सुकता असते. त्या वयात समजही कमी असते. त्यामुळे मुलांकडून अनावधानानं काही चुका होतात, मात्र त्या त्यांच्या जीवावर बेतू शकतात. लहान मुलांना चॉकलेट खूप प्रिय असते. पण हे चॉकलेट मुलांच्या कधी जीवावर बेतू शकते, असा कुणी विचारही केला नसेल. तुम्हीही मुलांना चॉकलेट देत असाल तर ही बातमी वाचाच. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा त्याच्या आई आणि बहिणीसोबत चॉकलेट खात रस्त्याच्या कडेने जात आहे. आजूबाजूला माणसं ये जा करत आहेत, तेवढ्यात हा लहान मुलगा खात असलेलं चॉकलेट त्याच्या घशात अडकतं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. यावेळी रस्त्यावर उभा असलेला एक तरुण त्या चिमुकल्याकडे धाव घेतो आणि उचलून त्याच्या छातीवर दाब देतो. काही क्षणात मुलाच्या घशात अडकलेलं चॉकलेट बाहेर पडतं. हा तरुण जर आला नसता तर कदाचीत लहान मुलाचा जीव गेला असता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: ‘मुलांना एक रुपया देणार नाही, कारण त्यांना..’ निवृत्त वडिल म्हणतात आता मी मजा करणार
दरम्यान यानंतर लहान मुलाच्या आई आणि बहिणीने त्या तरुणाचे आभार मानले. तर नेटकऱ्यांनीही या तरुणाचं कौतूक केलं आहे. अनेकांनी याला देवासारखा धावून आला अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.