MS Dhoni Fun Interaction With A Fan: भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे चाहते सर्वत्र पसरले आहेत. देशात नव्हे तर परदेशातही त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या धोनी अमेरिकेमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्यांचा आंनद घेत आहे . यावेळी धोनी यूएस ओपन २०२३ पुरुष एकेरीचा कार्लोस अल्काराझ आणि झ्वेरेव यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहण्यासाठी गेला होता. काही दिवसांपूर्वीच तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला होता. त्यांच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होता. आता, धोनीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चाहत्याकडे चॉकलेट मागतानाचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे.

धोनीने चाहत्याकडे मागितले चॉकलेट

‘एक्स’ (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका चाहत्याला धोनी मिनी बॅट्वर स्वाक्षरी देताना दिसत आहे. यानंतर धोनीने त्याला त्याचा चॉकलेट बॉक्स परत करण्यास सांगितले, जो त्याने ऑटोग्राफ देताना चाहत्याकडे दिला होता. तो फक्त म्हणतो, “चॉकलेट परत दे.” त्यावर त्याचा चाहता हसतो आणि ते चॉकलेट परत करतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “एमएस धोनी एका चाहत्याला ऑटोग्राफ दिल्यानंतर: “चॉकलेट परत दे.”

हेही वाचा – ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’; रातोरात प्रसिद्ध झालेल्या साईराजने नव्हे, ‘या’ दोन चिमुकल्यांनी गायलं आहे हे गाणं

हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. चाहत्यांना त्याचा हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे. काही लोक याचा पुरावा मानत आहेत की, भारतीय संघाच्या माजी कर्णधाराच्या नजरेतून फारसे काही सुटू शकत नाही.

हेही वाचा – कोण होईल सर्वात आळशी नागरिक? गेल्या २० दिवसांपासून लोळत पडले आहेत स्पर्धक, ‘या’ देशात सुरू आहे विचित्र स्पर्धा

हेही वाचा – लज्जास्पद! धावत्या रेल्वेतून कर्मचाऱ्याने थेट रुळावर फेकला कचरा; Viral Video पाहून भडकले लोक

आयपीएलच्या १७ व्या सीझनमध्ये धोनी खेळेल अशी आशा कायम आहे
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०२३च्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावले. यानंतर धोनीच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला. आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १७व्या सीझनमध्ये धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसेल अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. लवकरच पुढील सीझन खेळण्याबाबत निर्णय घेऊ शकतो अशी आशा सर्वांना आहे.