स्वयंपाक करणे ही एक कला आहे, असं आपण म्हणतो. पण, काही महिन्यांपासून पदार्थांचे जे जगावेगळे व्हिडीओ आपण बघत आहोत; त्याने स्वयंपाक ही कला राहिलेली नाही हे अगदी स्पष्ट आहे. या विचित्र पदार्थांमध्ये आता अजून एकाची भर पडली आहे आणि तो पदार्थ म्हणजे ‘छोले भटुरे आइस्क्रीम रोल’. हो तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. आता नक्की हा प्रकार काय आहे आणि लोकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला आहे ते बघू.
@foodie_tshr आणि @realatewithtshr यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये समोरची व्यक्ती भटुरा हातात घेऊन त्याचे लहान लहान तुकडे करताना दिसते. नंतर त्यामध्ये छोले व दूध घालून, त्याला एकत्र करून त्याचे रोल्स बनवीत आहे. हे मिश्रण अगदी आइस्क्रीम रोलप्रमाणेच दिसत आहे. शेवटी तो आपल्या या अतरंगी डिशला कांदा, छोले व हिरव्या चटणीने सजवतो.
हेही वाचा : भन्नाट जुगाड! ट्रॅक्टर अन् हातगाड्या वापरुन बनवली ‘बुलेट ट्रेन’: Viral Video एकदा पाहाच
‘छोले भटुरे आणि आइस्क्रीमप्रेमींना टॅग करा’ या व्हिडीओला १.५ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. पण, या व्हिडीओला छोले भटुरे आणि आइस्क्रीमप्रेमींनी ८०० हून अधिक कमेंट्स करून नापसंतीही दर्शवली आहे.