दरवर्षी २५ डिसेंबरला जगभरामध्ये नाताळ उत्साहात साजरा केला जात. नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांचा घराची सजावट करतात, एकमेकांना घरी बोलवातात, गिफ्ट देतात. ख्रिसमस समस आणि गिफ्ट म्हटलं की सर्वांना आठवतो तो सांताक्लॉज. लाला रंगाच्या कपड्यांमध्ये सांताक्लॉजच्या वेशभूषेमध्ये तो सर्वांना गिफ्ट देतो. लहान मुलांना या सांताचे आकर्षण असते. आजकाल अनेक कॉर्पोरेट आणि आयटी ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये आवर्जून नाताळ साजरा केला जातो. त्यासाठी पार्टी आयोजित केली जाते जिथे खास ड्रेसिंग थीम असते आणि वेगवेगळे गेम्सही खेळले जातात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे सिक्रेट सांता. नक्की कसा खेळला जातो सिक्रेट सांताचा गेम आणि काय आहेत हा त्याचे नियम जाणून घेऊ या.

ऑफिसमध्ये सिक्रेट सांता गेम कसा खेळला जातो?
सिक्रेट सांता या खेळाता सहभागी झालेले ऑफिसमधील सहकारी एकमेकांना गिफ्ट देतात पण कोणी कोणाला गिफ्ट दिले हे मात्र कोणालाच माहित नसते. म्हणूनच या गेमला सिक्रेट सांता असे म्हणतात. तुम्हाला गिफ्ट देणारा सिक्रेट सांता कोण आहे ते ओळखणे हाच गेम आहे. या गेमचा मुख्य नियम असा आहे की, तुम्ही कोणाला गिफ्ट देणार आहात हे कोणाला सांगायचे नाही. आजकाल जवळपास सर्व ऑफिसमध्ये हा गेम खेळला जातो पण कोण कोणाला गिफ्ट देणारा हे कसे ठरते

Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
IFA Officer Apala Mishra Success Story
UPSC परीक्षेत दोनदा अपयश, मित्रांकडून चेष्टामस्करी होऊनही हार मानली नाही; वाचा, कसा होता IFS अधिकारी अपाला मिश्रा यांचा प्रवास?
Two Uncle's Inside Kolkata Metro over Push and Shove fight video
“बाईईई हा काय प्रकार” धावती मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा; दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO झाला व्हायरल
Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
indian athletes performance in paralympics 2024
अन्वयार्थ : अक्षय क्षमतांचे क्षितिज!
Shakuntala Bhagat, First woman civil engineer,
शकुंतला भगत… भारतात ६९ पूल बांधणाऱ्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…

कोण असेल तुमचा सिक्रेट सांता, हे कसे ठरते?
ऑफिसमध्ये सिक्रेट सांता खेळताना सहभागींच्या नावाच्या चिठ्या काढल्या जात. मग एक एक चिठ्ठी उचलायाची आणि चिठ्ठीत जे नाव असेल त्या व्यक्तीसाठी खास गिफ्ट आणायचे. पण चिठ्या उचलताना अनेकादा गोंधळ होतो. कधी एकाच व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा येऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीचे कोणालाच येत नाही असेही होऊ शकते. पण तुम्हाला माहित आहे की सिक्रेट सांता निवडण्याचे काम सोपे करण्यासाठी तुम्ही काही ऑनलाईन वेबसाईट्स वापरू शकता.

हेही वाचा – तुमचे बाथरुम अत्यंत खराब झाले आहे का? स्वयंपाकघरातील ‘हा पांढरा पदार्थ वापरून करा सफाई

तुम्ही गुगलवर जाऊन Secret Santa Generator असे सर्च केले की तुम्हाला अशा अनेक वेबसाईट मिळतील ज्या सिक्रेट सांता निवडण्यासाठी मदत करतील. तुम्हाला अशाा वेबसाइटला भेट देऊन तुमच्या नावचे ॲडमिन अकाउंट किंवा होस्ट अकाउंट सुरू करावे लागेल आणि सहभागी झालेल्या इतर सहकाऱ्यांची नावे देखील टाकावी लागतील. त्यासाठी सिक्रेट सांता गेममध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे नाव आणि इमेल आयडी तुम्हाला द्यावे लागतील.

ॲडमिनने काय करावे?

१) Secret Santa Generator वेबसाईटला भेट द्या
२)ॲडमिन अकाऊंट सुरू करा
३) ‘Start Drawing Names’पर्यायावर क्लिक करा.
३) Enter names वर क्लिक करा. त्यात सुरुवातीला अॅडमिनच नाव टाका त्यानंतर इतर सर्व सहभागींचे नाव टाका.
४)Wish lists पर्याय निवडू शकता.
5) त्यानंतर Do not use exclusions पर्याय निवडा.
५)त्यानंतर तुम्ही गिफ्ट देण्याचा इव्हेंट केव्हा, कधी कुठे होणार आहे याची माहिती टाका.
६) त्यानंतर सर्व माहितीची एक लिंक दिसेल.
७) ही लिंक सहभागी सदस्यांना पाठवा.

सहभागी व्यक्तींनी काय करावे? तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे आहे हे कसे समणार?

१)सहभागी व्यक्तीनी ॲडमिनने दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लॉग इन करा.
२) Drawing Names असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
३) तिथे तुम्हाला इव्हेंट कधी आहे आणि सहभागी व्यक्तींच्या नावांची यादी दिसेल.
४) My drawn name वर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणाला गिफ्ट देणार आहात हे स्किनवर दिसेल
५) Wish list या पर्यायमध्ये तुम्हाला हवे असलेले गिफ्ट तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुम्हाला काय गिफ्ट द्यावे हे तुमच्या सिक्रेट सांताला समजू शकते.

हेही वाचा – तुम्हीही ऑफिसमध्ये आठ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर काम करताय? त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? जाणून घ्या…

सिक्रेट सांता सेलिब्रेशन कसे करावे?
ज्या दिवशी तुम्ही सिक्रेट सांता गेमचे गिफ्ट देणार आहात त्या दिवशी सर्वांना एका ठिकाणी बोलवा.
ज्या व्यक्तीसाठी गिफ्ट आहे त्याचेच नाव फक्त गिफ्टवर टाका. चुकूनही स्वत:चे नाव टाकू नका. ते गिफ्ट एका ठिकाणी जमा करा.
प्रत्येकाने आपल्या नावाचे गिफ्ट घ्यावे आणि ते खोलून पाहा. तुम्हाला गिफ्ट देणारा सिक्रेट सांता कोण आहे ते ओळखा.