सोशल मीडियावर सध्या चोरीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. इतकंच नव्हे तर हा व्हिडीओ पाहून लोक सावधान होऊ लागले आहेत. कारण ज्या पद्धतीने या व्हिडीओमधील व्यक्तीला दिवसाढवळ्या भररस्त्यात लुटलं गेलंय, त्या चोरीची पद्धत पाहून तुमचं डोकं नक्कीच चक्रावून जाईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असून लोक हैराण झाले आहेत.
आतापर्यंत तुम्ही चोरीच्या वेगवेगळ्या घटना पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. पण या व्हायरल व्हिडीओमधील चोरीची पद्धत पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. एखाद्या चित्रपटाचा सीन पाहतोय अगदी त्या पद्धतीने या व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीला दिवसाढवळ्या लुटलं गेलंय. म्हणजेच अगदी पद्धतशीर प्लॅनिंग करून ही चोरी करण्यात आलीय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या कारमधून प्रवास करत असतो. तितक्यात त्याच्या कारच्या बाजूने दोन जण बाईकवरून पुढे येतात आणि त्याच्या कारच्या चाकाकडे इशारा करत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या कारच्या चाकांमधली हवा गेली असल्याचं ते दोघेजण सांगतात. हे पाहून कारमध्ये बसलेला व्यक्ती बाहेर येतो आणि कारच्या चाकांमधली हवा तपासतो. पण कारच्या चाकांमधील हवा व्यवस्थित असते. हे पाहून व्यक्ती थोडा गोंधळतो आणि पुन्हा कारमध्ये बसण्यासाठी जात असतो.
तितक्यात त्याच्याजवळ एक महिला येते आणि काही तरी दाखवत त्याला पत्ता विचारते. हा व्यक्ती पत्ता पाहून महिलेला रस्ता सांगत असतो. त्याचं लक्ष विचलीत करण्यासाठीचा हा प्लान असतो. व्हिडीओमधील व्यक्ती महिलेला तिच्या पत्त्यावर कसं जायचं हे सांगत असतानाच मागून एक व्यक्ती येतो आणि कारमध्ये मागच्या सीटवर ठेवलेली बॅग उचलून घेऊन जातो. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, कशा पद्धतीने या व्यक्तीला काही कळण्याच्या आत त्याला लुटण्यात आलंय. ज्यावेळी त्याला कळलं की आपण लुटलो गेलोय तोपर्यंत खूप उशिर झाला होता. या चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. ‘ghantaa’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तसंच या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत सावधान आणि सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात येतंय.