Chris Hemsworth Hammer Tweet Viral : वेटलिफ्टर मीराबाई चानू सध्या खूप चर्चेत आहे. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून तिने जगभर भारताचं नाव रोशन केलं आहे. याबद्दल सर्वसामान्यांपासून ते अनेक मोठे स्टार्स तिचे अभिनंदन करत आहेत. यात हॉलिवूड फिल्म ‘थॉर’ मधील अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ हा सुद्धा मीराबाई चानूचा मोठा फॅन बनला आहे. नुकतंच त्याने ट्विटरवर एक ट्विट करत वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचं अभिनंदन करत तिच्या कामगिरीचं कौतुक केलंय. त्याचं हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यानंतर हा अभिनेता चांगलाच चर्चेत आलाय. त्याचं कारणही तसंच आहे. हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ याच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला टॅग करत ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ असं सांगितलं. मग यावर अभिनेता ख्रिस हेम्सवर्थने जे उत्तर दिलंय ते वाचून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा