जगभरात आज ख्रिसमस डे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. प्रभु येशूचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या सेलिब्रेशनसाठी अनेक दिवस आधीच घरा-घरात सजावट केली जाते. रंगीबेरंगी दिवे, सजावटीचे साहित्य आणि भेटवस्तूंच्या मदतीने ख्रिसमस ट्रीची सजावट केली जाते. याच सजावटीचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा दिवसही आनंदी होईल. या व्हिडीओत एक गोंडस पोपट ख्रिसमस ट्रीला खूप सुंदर सजावट करताना दिसतोय. पक्षाचा हा मोहकपणा पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य येईल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक पोपट सजावटीच्या सुंदर वस्तूंनी एक लहान ख्रिसमस ट्री सजवताना दिसत आहे. पोपट चोचीने एक एक सजावटीच्या वस्तू उचलतो आणि ख्रिसमस ट्रीवर लटकवतो. ख्रिसमस ट्री सजवल्यानंतर पोपट तिथून निघून जातो. पण, त्याची ट्री सजवण्याची स्टाईल तुम्हालाही खूप आवडेल.
हा व्हिडीओ एक्सवर @Yoda4ever नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे – डेकोरेटिंग द ख्रिसमस ट्री. या व्हिडीओला शेअर केल्यापासून हजारो व्ह्यू मिळाले आहेत. दरम्यान, अनेक युजर्सनी यावर वाह खूप छान, खूप गोंडस, अमेझिंग अशा कमेंट्स केल्या आहेत.