Manali Heavy Snowfall Viral Video : वर्ष २०२४ चा शेवटचा आठवडा सुरु आहे. काही दिवसांनी आता नवीन वर्ष २०२५ सुरु होईल. नवीन वर्ष आणि ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी पर्यटक सध्या हिमाचल प्रदेशातील शिमला,मनाली यांसारख्या पर्यटन ठिकाणांवर गर्दी करताना दिसतायत. अशात हिमाचल प्रदेशातील मनाली येथील काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एककीडे जोरदार बर्फवृष्टीमुळे मनालीच्या सोलांग व्हॅलीपासून अटल टनलपर्यंत १००० हून अधिक वाहने जाममध्ये अडकल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरुन प्रवास करताना पर्यटकांना जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय. यामुळे तुम्ही देखील पर्यटनासाठी हिमाचलमधील कुल्लू मनाली, शिमला याठिकाणांना भेट देणार असाल तर आधी हे धडकी भरवणारे व्हिडीओज एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पर्यटकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

हिमाचलमधील शिमला, मनालीसह अनेक ठिकाणी हवामान खूपच खराब होत असल्याची स्थिती आहे. याठिकाणी जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊसामुळे पर्यटक ठिकठिकाणी अडकून बसले आहेत. रस्त्यावर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरुन वाहनांना पुढे जाणेही शक्यत होत नाहियेय. बर्फामुळे रस्ते निसरडे झाल्याने वाहन घसरुन सरळ समोरच्या वाहनांना जाऊन धडक देताना दिसतायत. त्यामुळे वाहनांमधील पर्यटकांना तिथे जीव मुठीत घेऊन प्रवास करतावा लागतोय.

बर्फाळ रस्त्यावर चालकांना वाहनावर कंट्रोल करणं अशक्य

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वत्र बर्फ पसरला आहे. ज्यामुळे काही भागात रस्ता दिसेनासा झाला आहे. तर काही ठिकाणी निसरड्या रस्त्यावरुन वाहन थेट घसरुन जाताना दिसतायत. अशा परिस्थितीत चालकाला वाहनावर कंट्रोल करणं अशक्य होत आहे, त्यामुळे चालकासह पर्यटकही चालत्या वाहनातू उडी घेत आपला जीव वाचवताना दिसतायत.

कारण काही भागात तर वाहन बर्फाळ रस्त्यावर घसरुन थेट दरीत कोसळेल की काय अशी भीषण स्थिती आहे.

नैनीतालमध्ये तर प्रवाशांनी भरलेली एक बर्फाळ रस्त्यावरुन उलटी मागे घसरताना दिसली. ज्यामुळे सध्या तिथे प्रवास करणे किती कठीण आहे याचा अंदाज येऊ शकतो.

जोरदार बर्फवृष्टी आणि वाऱ्यामुळे हिमाचल प्रदेशताली अनेक ठिकाणचे ३२ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. याशिवाय काही जिल्ह्यांतील विविध ठिकाणी वीज आणि पाण्याचे कनेक्शनही तोडण्यात आले आहेत. बदलते हवामान आणि बर्फवृष्टीमुळे राज्यातील सार्वजनिक सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत. पण तरीही हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीनंतर शिमला आणि मनालीसह कुफरी, नारकंडा आणि सोलांग व्हॅलीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होताना दिसत आहेत.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळच्या पर्यटन स्थळांव्यतिरिक्त कुफरी आणि नारकंदा, खडापठार, चौधर आणि चंशाल या उंच भागातही बर्फवृष्टी झाली आहे. याशिवाय मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी मध्य आणि उच्च भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पर्यटकांना हिमाचल प्रदेशमध्ये जाणार असाल तर काळजी घ्या.