Christmas Celebration in Manali: हिमाचल प्रदेशात पावसाळ्यात आलेल्या आपत्तीनंतर पहिल्यांदा कुल्लू आणि मनालीमध्ये प्रवासी दिसत आहे. गेल्या ३ दिवसात जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा झाली आहे. हिमाचलमधील कुल्लू आणि मनालीमध्ये सध्या ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मनालीच्या मॉल रोडवरून प्रवासी प्रवास करत आहे. तर दुसरीकडे अटल बोगद्यासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक बर्फाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिस्थिती अशी आहे की, सोलांग व्हॅलीमधून अटल बोगद्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथे धिम्या गतीने गाड्या पुढे जात आहे. पोलिसांना वाहतूक कोंडी नियंत्रण करण्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागत आहे. खरंतर, मनालीची परिस्थिती पाहाता असे वाटते की, येथे प्रवाशांचा पूर आला आहे. अलट बोगद्यामधून एका दिवसामध्ये २८ हजार पर्यटकांची वाहनांची ये-जा झाली. मनालीमध्ये वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवासी वैतागले आहेत. पलचान, अटल बोगदासह शहराच्या इतर भागामध्ये मोठी कोंडी झाली आहे.

हिमाचल पोलिसांनी आकडेवारी जाहीर केली आहे. कुल्लू मनालीमध्ये गेल्या ३ दिवसामध्ये कसोल, बंजारच्या तिर्थन व्हॅली सारख्या ठिकाणांनी ५५ हजार गाड्यांची ये-जा झाली आहे. ख्रिसमस आणि नववर्ष होईपर्यंत मनालीमध्ये हे चित्र असेच राहणार आहे.

न्युज १८ला माहिती देताना, मनालीच्या डीएसपी केडी शर्मा यांनी सांगितले की, ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले आहेत अतिरिक्त पोलिस दलातील जवान आणि होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले आहे. सीसीटिव्हीद्वारे सर्वत्र नजर ठेवली जात आहे. जीएसकपी केडी शर्माने सांगितले की, २२ डिसेंबरला मनालीमध्ये ४०००च्या आसपास पर्यटक वाहन मनालीमध्ये आले होते. तर २४ डिसेंबरला १६०००० गाड्या मनालीमध्ये आल्या होत्या.

हेही वाचा – ख्रिसमसच्या दिवशी मिस्टलेटो झाडाखाली लोक Kiss का करतात? त्यामागे आहे रंजक गोष्ट; जाणून घ्या विविध परंपरा

न्युज १८ला माहिती देताना मनाली होटलिअर असोसिएशनच्या अध्यक्ष मुकेश ठाकुरने सांगितले की, मनालीमध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने दुसऱ्या राज्यातून पर्यटक पोहचले आहेत. त्यांनी सांगितले की, मनाली ९- प्रतिशत हॉटेल बूक झाले आहेत आणि अजूनही सतत त्यांच्याकडे बुकिंग येत आहे. मनालीमध्ये अटल बोगद्यासह सिस्सूमध्ये काल ताजी बर्फवृष्टी झाली, ज्यामुळे पर्यटकांना मनालीमध्ये ख्रिसमसनिमित्त बर्फाचा आनंद लुटण्याचा आनंद घेता येईल.

रविवारी अटल बोगद्यामधून बाईकर्सला पुढे सोडले नाही. रस्त्यावर काळा बर्फ जमा झाल्याने गाड्या सटकू शकतात. त्यामुळे बाईक पुढे सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – Jingle Bell गाणे कसे झाले प्रसिद्ध? काय आहे या गाण्याचा अर्थ; जाणून घ्या त्यामागची रंजक गोष्ट

कुल्लू आणि लाहौल पोलिस कर्मचारी अटल बोगद्या आणि सिस्सूजवळ सतत ड्युटीवर तैनात असतात. येथील तापमान -१२ अंशाच्या आसपास असून पोलीस कर्मचारी थंडीतही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.