बहुतेक लोक सणासुदीच्या काळात प्रवास करतात. अशा स्थितीत कधी जागा मिळणे कठीण होते तर कधी कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होते. अलीकडे, लाखो लोक ख्रिसमस आणि नववर्षाच्या वर्षअखेरीच्या सणांसाठी पाश्चात्य देशांमध्ये प्रवास करत आहेत. या काळातील अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर दिसत आहेत. कुणी घरी पोहोचल्याचा आनंद व्यक्त करत आहे, तर कुणी आपल्या प्रियजनांकडे जाण्यासाठी आतूर झालेले दिसत आहे. अलीकडेच नाताळच्या मुहूर्तावर आपल्या आजीला भेटायला गेलेल्या एका ६ वर्षाच्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ख्रिसमसच्या निमित्ताने कुटुंबीयांनी मुलाला त्याच्या आजीकडे पाठवले होते, परंतु एअरलाइन्सच्या एका चूकीमुळे तो मुलगा चक्क १६० मैल म्हणजे जवळपास २५७ किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी पोहचला.

एअरलाइन्सच्या चुकीमुळे १६० मैल दूर अंतरावर पोहोचले

एक सहा वर्षांचा मुलगा त्याच्या आजीला ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये भेट देण्यासाठी निघाला होता तो चुकीच्या विमानात बसल्यामुळे आजीच्या घरापासून चक्क १६० मैल (२५७ किमी) दूर अतंरावर पोहचला, असे स्काय न्यूजच्या बातमीमध्ये सांगितले आहे. एकटा प्रवास करत असेला मुलगा दक्षिण पश्चिम फ्लोरिडामधील फोर्ट मायर्सऐवजी ऑर्लॅंडोमध्ये उतरला. त्याची आजी मारिया रामोस ही दक्षिणपश्चिम फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची वाट पाहत होती.

2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
Crime News In Marathi
Crime News : आतडे फाडले अन् हवेत… आईच्या प्रियकराची भावंडांकडून क्रूर हत्या
Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Parents congratulated their children for not coming home on time
‘पप्पा, मला माफ करा…’ मुलं वेळेवर घरी आली नाहीत म्हणून आई-वडिलांनी केला सत्कार… VIDEO पाहून येईल हसू

हेही वाचा – कांद्यामध्ये ‘हे’ तेल टाकून पेटवा वात? भन्नाट ट्रिक वापरून पाहा, मच्छर, पाल आणि उंदरांपासून मिळू शकते सुटका

वास्तविक, एअरलाइन्सच्या एका चुकीमुळे, एक ६ वर्षाचा मुलगा त्याच्या आजीपासून १६० मैल दूर पोहचला. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, आईने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दक्षिण पश्चिम फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणासाठी फ्लाइट अटेंडंटच्या स्वाधीन केले होते, परंतु एअरलाइन्सने त्याला चुकीच्या विमानात बसवले त्यामुळे हा मुलगा चक्क १६० मैल दूर असलेल्या ऑरलँडोला पोहोचला.

हेही वाचा – लग्न मंडपात सुरु होते विधी; नवरी बसल्या बसल्या पेंगत होती, नवरदेवाने…. Viral Video पाहून लोकांना आवरेना हसू

एअरलाइन्सने कुटुंबीयांची माफी मागितली

अहवालानुसार, मुलाला चुकीच्या शहरात सोडण्यात आले होते. मुलाच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी एअरलाइन्सवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि त्यांच्याकडून या संदर्भात जाबही मागितला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एअरलाइन्सने मुलाच्या कुटुंबीयांची माफी मागितली आणि त्याच्या घरी परतण्याची व्यवस्था केली. कुटुंबीयांनी एअरलाइन्सविरोधात तक्रारही दाखल केल्याचे समजते आहे, त्यानंतर विमान कंपनीने मुलाला सुखरूप घरी आणण्याची जबाबदारी घेतली. सोशल मीडियावरही लोक ट्रोल करत आहेत आणि त्यांचा राग एअरलाइन्सवर काढत आहेत.

Story img Loader