Viral Video : गाव आणि शहर हे एका नदीचे दोन टोक. हल्ली नोकरी शिक्षणासाठी अनेक जण गाव सोडून शहराकडे जाताना दिसताहेत. अशात अनेक लोक शहरांकडे स्थलांतर होत आहे. लोक शहराकडे घर घेऊन शहरी जीवन स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे.
काही लोकांना शहरात राहून सुद्धा गावाकडचे आयुष्य सुद्धा खूप आवडते. तुम्हाला गावातील राहणीमान आवडते की शहरातील?
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये गावातील चुल घर आणि शहरातील मॉडर्न किचन दाखवले आहे. तुम्हाला गावाकडील चुल घर आवडते की शहरातील मॉडर्न किचन आवडते? या व्हिडीओमध्ये चुल घर आणि मॉडर्न किचनमधील फरक सांगितला आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओध्ये तुम्हाला दिसेल की एका खोलीचे दोन भाग विभागले आहे. खोलीच्या एका भागात एक तरुणी गावाकडील चुल घर तयार करताना दिसत आहे तर दुसऱ्या भागात दुसरी तरुणी शहरातील मॉडर्न किचन तयार करताना दिसतेय. व्हिडिओ पाहून तुम्हाला दोन्ही गोष्टींमधील फरक दिसून येईल. व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला एक तरुणी चुलीवर स्वयंपाक करताना दिसतेय आणि दुसरी तरुणी गॅस शेगडीवर स्वयंपाक करताना दिसतेय.
हेही वाचा : खरा शिवप्रेमी! कुबड्या हातात घेऊन सैर केला रायगड, अपंग व्यक्तीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
पाहा व्हिडीओ
hetal_diy_queen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “२० व्या शतकातील आणि २१ व्या शतकातील स्वयंपाकघर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जुनं ते सोनं” तर एका युजरने लिहिलेय, “गावाकडील चुल घर आवडले” आणखी एका युजरने लिहिलेय, “मराठी संस्कृती” व्हिडीओ पाहून अनेक युजर्सना गावाकडील चुल आवडली आहे तर काही लोकांना या व्हिडीओतील क्रिएटिव्हीटी खूप आवडली आहे.