Pakistani Girl Viral Video: तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक पाकिस्तानी मुलगी म्हणाली होती, ‘ये हमारी कार है, ये हम हैं और ये हमारी पॉवरी हो रही है. यानंतर हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की पाकिस्तानातच नाही तर भारतातही याचे पडसाद उमटले होते. प्रत्येकजण त्याची कॉपी करून आपापल्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत होता. बरेच महिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा यावर व्हिडीओ बनवताना दिसले होते. आता ती मुलगी सोशल मीडियावर स्टार झाली असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या पाकिस्तानी तरुणी दानानीरने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो खूप पाहिला जात आहे.

पाकिस्तानी मुलीने गायले ‘चुपके से लग जा गले’ गाणे

पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी तरुणीने बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गाणे गायले, ज्याचे लोक खूप कौतुक करत आहेत.दानानीरचे इंस्टाग्रामवर २.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ लाखो व्ह्यूज आहेत. दानानीरने बॉलीवूड गाणे गायलेले रील पाहून लोक जोरदार टाळ्या वाजवत आहेत. तिने ‘चुपके से, चुपके से…लग जा गले’ गाण्याची सुरुवात केली आणि नंतर काही काळ गाणे चालू ठेवले. काही सेकंदांच्या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले, कारण लोकांना त्याचा आवाज खूप आवडला. तसंच, काही लोक होते ज्यांना आवाज आवडला नाही.

( हे ही वाचा: “तुझ्या बुलेटची फटफट बंद कर…”; म्हशीने दाखवला असा इंगा की तरुणाला घडली जन्माची अद्दल)

( हे ही वाचा:Rare Melanistic Tiger: भारतात पहिल्यांदाच झालं दुर्मिळ काळ्या बछड्याचं आपल्या आईसोबत दर्शन; IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ)

भारतीय वापरकर्त्यांनीही कौतुक केले

तिने गायलेल्या गाण्याला केवळ पाकिस्तानीच नाही तर भारतीयांनीही सोशल मीडियावर कौतुक केले. अमित नावाच्या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, ‘वाह खूप चांगला आवाज आहे.’ दुसरा म्हणाला, ‘हे गाणं गाणं सोपं नसून ते खूप अवघड गाणं आहे. म्हणूनच तू चांगला प्रयत्न केलास. एका पाकिस्तानी चाहत्याने लिहिले, ‘माशाअल्लाह, तुझा आवाज खूपच सुंदर आहे, तुझ्यासारखाच.’ या व्हिडिओला इंस्टाग्रामवर १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दानानीर अनेकदा असे काही व्हिडिओ पोस्ट करून मन जिंकते.

Story img Loader