CIDCO Lottery 2024 Dates: मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत वेगाने होणारा विकास पाहता, तिथे घर खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशाच अनेकांना नवी मुंबईत पडवडणारी घरं खरेदी करता यावी यासाठी सिडकोकडूनही नवी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. या लॉटरीअंतर्गत सिडकोची तब्बल ४० हजार घरे विकली जाणार आहे, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार आहे. सिडकोच्या या ४० हजार घरांचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वर्तवली आहे.

सिडकोच्या या इमारती नवी मुंबईतील बस आगार व अवजड वाहनतळ, रेल्वेस्थानकांच्या फोरकोर्ट परिसरात बांधल्या जात आहेत. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या उद्देशाने सिडको मंडळ ही घरं बांधत आहे.

सिडकोची घरं कोणत्या भागात आहेत? (Where are the Flats for CIDCO 2024?)

सिडको नवी मुंबईतील खांदेश्वर, जुईनगर, वाशी, नेरुळ, सानपाडा, मानसरोवर, खारघर व इतर रेल्वेस्थानकांपासून हाकेच्या अंतरावर ही घरं बांधत आहे.

हेही वाचा – Aadhar Card Update : लग्नानंतर आधारवरील नाव आणि पत्ता बदलायचाय? जाणून घ्या सोपी पद्धत

सिडको पहिल्यांदाच ‘अशाप्रकारे’ राबवणार विक्रीची सोडत

दरवेळेपेक्षा या वेळी ग्राहकांना त्यांची सदनिका, इमारत व मजला निवडण्याची संधी सिडकोने ऑनलाइन सोडतीमध्ये ठेवल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीची सदनिका व मजला निवडता येणार आहे. सिडको मंडळाच्या सदनिका विक्रीच्या सोडत पद्धतीत पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात येणार आहे. परंतु, अजूनही सर्व महागृहनिर्माण योजनांमधील घरांचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने दोन टप्प्यांत सिडको ही सोडत काढणार आहे. सिडकोने अद्याप या घरांसाठी कोणताही अधिकृत जाहिरात काढलेली नाही. त्यामुळे या घरांच्या किमती, क्षेत्रफळ किंवा उत्पन्न गट याबाबतची कोणतीही माहिती अद्याप तरी जाहीर झालेली नाही. पण भविष्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही खालील पद्धतीने अर्ज भरु शकता.

अर्ज कसा भरायचा? (How to apply for CIDCO Lottery 2024)

१) सर्वप्रथम CIDCO च्या अधिकृत https://lottery.cidcoindia.com वेबसाइटवर जा.

२) अर्ज करण्यासाठी ‘Register for lottery’ ऑप्शन निवडा.

३) तुमचा सध्याचा पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याचे तपशील यांसारखी माहिती भरा.

४) वेबसाइटवर नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करा.

५) सिडकोच्या घरासाठी भरलेला ऑनलाइन अर्ज नीट, काळजीपूर्वक वाचा.

६) एकदा तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे ते तपासा आणि नंतर तुमचा अर्ज सबमिट करा.

६) नोंदणी शुल्क भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या उत्पन्न गटानुसार पेमेंट करा. तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड अशा पर्यायांचा वापर करून पेमेंट करू शकता.

७) अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता.

सिडको गृहनिर्माण योजना २०२४ : आवश्यक कागदपत्रे (Documents Required for the CIDCO Lottery Scheme 2024)

१. पॅन कार्ड
२. आधार कार्ड
३. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
४. उत्पन्नाचा दाखला
५. मतदार ओळखपत्र
६. पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
७. जन्म प्रमाणपत्र
८. अर्जदारांचे संपर्क तपशील.
९. बँक तपशील

सिडको लॉटरी २०२४ साठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष (Eligibility Criteria to Apply for the CIDCO Lottery 2024)

तुम्हाला सिडको लॉटरीसाठी अर्ज करायचा असल्यास, अर्जदार म्हणून तुम्ही महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य केले आहे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुम्ही नवी मुंबईचे रहिवासी असल्याची आवश्यकता नाही. परंतु, तुम्ही महाराष्ट्रात कुठलेही रहिवासी असलात तरी त्याचा तुम्हाला पुरावा सादर करणे गरजेचे आहे.

या व्यतिरिक्त तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा सादर करणेदेखील आवश्यक असेल. जर तुम्ही सिडको लॉटरी योजनेअंतर्गत EWS फ्लॅट पाहत असाल तर तुमचे उत्पन्न दर महिना २५ हजारपेक्षा जास्त असता कामा नये. जर तुम्हाला LIG सिडको लॉटरी योजनेअंतर्गत फ्लॅट हवा असेल तर तुम्ही २५ ते ५० हजार रुपये दरमहा कमावता हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे.