सध्याच्या जमान्यात ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याची क्रेझ लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिसून येते. अनेकांना बाजारात जाऊन खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा ते ऑनलाईन मागवून ते घरात बसून खायला आवडतात. शिवाय बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत. ज्या तुम्हाला घरपोच अन्न पोहोचवतात. त्यामुळे लोकांना आरामात घरी बसून विविध खाद्यपदार्थ खायला आवडतं. परंतु ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आणि डिलिव्हरी बॉयशी संबंधित अनेक विचित्र बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा लोक जो पदार्थ ऑर्डर करतात त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी त्यांना दिलं जातं. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने ऑनलाइन मागवलेल्या ऑर्डरमध्ये असं काही आढळलं, जे पाहून तिला धक्काच बसला आहे.

या घटनेबाबत एका महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्याबरोबर घडलेला किस्सा शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितलं की, तिने तिच्या मुलांसाठी मॅकडोनाल्डमधून हॅप्पी मील ऑर्डर केले होते, मात्र, या मीलमध्ये तिला असे काही आढळले ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. ३५ वर्षीय जेम्मा कर्क-बोनरने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टसोबत तिने एक फोटोही शेअर केला. तिने सांगितलं, मी माझ्या मुलांसाठी इंग्लंडमधील बॅरो-इन-फर्नेस येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमधून हॅपी मील ऑर्डर केले होते.

हेही वाचा- पायलटचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ; विमान हवेत असतानाच दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न, म्हणाला, “मी स्वप्नात…”

https://www.facebook.com/photo?fbid=980311319724594&set=a.126621391760262

मीलमध्ये सिगारेटचे तुकडे

मी घरी पोहोचल्यानंतर काबेल आणि जॅक्सन नावाच्या माझ्या मुलांना ते मील खाऊ घालू लागले. यावेळी मला धक्काच बसला कारण मी मुलांना जे मील खाऊ घालत होते. त्या मीलच्या पॅकेटमध्ये चक्क सिगारेटचे तुकडे आणि राख दिसली. सिगारेटचे तुकडे आणि राख दिसताच तिने फेसबुकवर लिहिलं, “खेळणी विसरा… आता सिगारेटचे तुकडे आणि राखेसोबत अधिकची चव येत आहे.” महिलेने पुढे सांगितलं की, मी या प्रकरणाबाबत तक्रार करण्यासाठी कंपनीला फोन केला पण ते माझ्याशी उद्धटपणे बोलले आणि त्यांनी फोन ठेवला. ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader