आज चाळीत राहणाऱ्यांचे भविष्यात बिल्डिंगमध्ये राहण्याचे स्वप्न असते. तर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांचे भविष्यात स्वत:चा बंगला घेऊन राहण्याचे स्वप्न असते. काहींचे हे स्वप्न काही वर्षात पूर्ण होते पण बहुतेकांचे स्वप्न अनेक वर्षे प्रयत्न करुनही पूर्ण होत नाही. यात एखाद्या झोपडीतून सुरु केलेला प्रवास अलिशान बंगल्यापर्यंत आणणे तितकेसे सोप्पे नाही. यासाठी एखाद्या व्यक्तीला किती परिश्रम करावे लागले असतील याचा विचार करणेही अवघड जाईल. यामुळे कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा शून्यापासून सुरु झालेला प्रवास कधीच सोप्पा नसतो. प्रत्येकाला आयुष्यात ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचताना यश अपयशाच्या पायऱ्या चढूनच जावे लागते. भारतात अशी अनेक उदाहरणं आहे, जी इतरांसाठी आदर्श बनत आहेत. यातील अनेक लोक गरीबीतून आपला प्रवास सुरु करतात आणि कठोर परिश्रमाने यशाचे शिखर गाठतात. अशाचप्रकारे आज एका मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून काम करणारे नेल्लयप्पन बी यांनी आपला झोपडीतून सुरु केलेला जीवनाचा प्रवास एका आलिशान बंगल्यापर्यंत आणून पोहोचवला. त्यांच्या या यशाचे आज देशभरातून कौतुक होत आहे. नेल्लयप्पन बी यांनी स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी भूतकाळातील आयुष्यातील प्रवासाबद्दल संक्षिप्तरित्या सांगितले आहे.

नेल्लयप्पन बी हे नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत. ते प्रशासकीय अधिकारी आहेत. प्रशासकीय अधिकार्‍यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात याबद्दल तुम्हाला माहितच असेल, पण ते सहजासहजी प्रत्येकालाच मिळत नाही. यासाठी त्यांना कठोर परिश्रम करून अभ्यास करावा लागतो आणि कठीण परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. त्यानंतर आपला वेळ देश आणि जनतेच्या सेवेत घालवावा लागतो. नुकतेच नेलयप्पनने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये तो पूर्वी कुठे राहत होता आणि आता कुठे राहतो हे सांगितले आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Lawyer charter suspended , Police Patil, Lawyer Police Patil, Lawyer,
पोलीस पाटील पदावर काम केल्यामुळे वकिलाची सनद निलंबित
The BJP has promised to accommodate the concerns of alliance partners both in terms of representations and other important portfolios
Home Ministry : गृहखातं देण्यास भाजपाचा नकार; शिवसेनेला ‘या’ खात्यांचा दिला पर्याय!

हा अधिकारी पूर्वी एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत होता, त्याने दोन फोटो शेअर केले आहेत. एकात मोडकळीस आलेली झोपडी दिसते, तर दुसऱ्यात मोठा अलिशान बंगला दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही दोन्ही घरं त्याचीच आहेत. पूर्वी ते आपल्या कुटुंबासह त्या झोपडीत राहत होते पण आता ते या बंगल्यात राहत आहे. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की- “पूर्वी मी माझ्या आई-वडील आणि चार भावंडांसोबत या एका खोलीच्या झोपडीत राहायचो. मी वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत इथे राहिलो आहे. देवाचा आशीर्वाद शिक्षण, समर्पण आणि कठोर परिश्रम यातून मी इथपर्यंत पोहोचलो आहे.

नेलयप्पनची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट केली की, कोणत्याही संसाधनांचा अभाव असताना शिक्षण हेच स्वातंत्र्याचे खरे साधन आहे. एतर दुसऱ्या एकाने म्हटले की, सोशल मीडियावर त्याने यापेक्षा चांगले काहीच पाहिले नाही.

Story img Loader