आज चाळीत राहणाऱ्यांचे भविष्यात बिल्डिंगमध्ये राहण्याचे स्वप्न असते. तर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांचे भविष्यात स्वत:चा बंगला घेऊन राहण्याचे स्वप्न असते. काहींचे हे स्वप्न काही वर्षात पूर्ण होते पण बहुतेकांचे स्वप्न अनेक वर्षे प्रयत्न करुनही पूर्ण होत नाही. यात एखाद्या झोपडीतून सुरु केलेला प्रवास अलिशान बंगल्यापर्यंत आणणे तितकेसे सोप्पे नाही. यासाठी एखाद्या व्यक्तीला किती परिश्रम करावे लागले असतील याचा विचार करणेही अवघड जाईल. यामुळे कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा शून्यापासून सुरु झालेला प्रवास कधीच सोप्पा नसतो. प्रत्येकाला आयुष्यात ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचताना यश अपयशाच्या पायऱ्या चढूनच जावे लागते. भारतात अशी अनेक उदाहरणं आहे, जी इतरांसाठी आदर्श बनत आहेत. यातील अनेक लोक गरीबीतून आपला प्रवास सुरु करतात आणि कठोर परिश्रमाने यशाचे शिखर गाठतात. अशाचप्रकारे आज एका मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून काम करणारे नेल्लयप्पन बी यांनी आपला झोपडीतून सुरु केलेला जीवनाचा प्रवास एका आलिशान बंगल्यापर्यंत आणून पोहोचवला. त्यांच्या या यशाचे आज देशभरातून कौतुक होत आहे. नेल्लयप्पन बी यांनी स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी भूतकाळातील आयुष्यातील प्रवासाबद्दल संक्षिप्तरित्या सांगितले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा