Lalbaugcha raja 2023 देशासह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करत आहेत, मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाच्या मंडपात उत्सवाला गालबोट लागलं आहे. दरवर्षी प्रमाणे मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरताना दिसत आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडपात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये ही हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत.
या व्हिडीओत दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केली जात असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान, मंडपात मोठा गोंधळ देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.दरम्यान, अगदी दोन दिवसांपूर्वी लालबाग राजाच्या मंडपातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं दिसून येत होतं. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत चिरडताना दिसून आले. विशेष म्हणजे, यावेळी मुंबई पोलीस कुठेही दिसत नव्हते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाला गेलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी; भाविक जखमी, धक्कादायक घटनेचा Video व्हायरल
काही वेळापूर्वीच हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे. लालबागच्या राजाच्या मंडळात असे प्रकार दरवर्षी घडत असल्याचं आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतं. कधी पदाधिकारी आणि पोलिसांमधील हाणामारी, तर कधी पोलिसांकडून पत्रकारांवर करण्यात आलेली अरेवारी, तर कधी भाविकांना झालेली धक्काबुक्की… यांसारखे प्रकार अनेकदा घडतात आणि त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.