हृदयविकाराच्या झटक्यामुळे आजकाल अनेक तरुण मुलांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. कोणी जिममध्ये व्यायाम करताना अचनाक कोसळतो, तर कोणी मित्रांसोबत खेळायला गेल्यावर दम लागल्याचं निमित्त होतं आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. अशातच आता एका १६ वर्षाच्या मुलाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचं म्हटलं आहे. या घटनेच माहिती आजकत या वृत्तवाहिनीने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर येथे घडली आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान धाव घेताना अनुज पांडे नावाच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. अनुजसोबत खेळणाऱ्या मुलांनी सांगितलं की, खेळताना अनुज धाव घेताना पळत असताना तो अचानक अडखळला आणि खेळपट्टीवर पडला. यानंतर काही क्षणात त्यांच्या शरीराची हालचाल थांबली. तर आपल्या मुलाला कोणताही आजार नससल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाला कोणताही आजार नव्हता असं सांगितलं तर डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचं सांगितलं.
मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं, बुधवारी सकाळी अनुज त्याच्या मित्रांसोबत बिल्हौर इंटर कॉलेज मैदानावर क्रिकेट खेळायला जातो असे सांगून गेला होता. तर त्याच्या मित्रांनी सांगितलं की, अनुजची टीम २१ धावांवर खेळत होती. एका फलंदाजाने एका चेंडूवर शॉट मारला असता २२ वी धाव घेण्यासाठी अनुज पळाला, त्याचवेळी त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. तेथील मुलांनी बेशुद्ध अनुजचे हातपायासह छातीवर चोळले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
मैदानावर खेळणाऱ्या काही मुलांनी या घटनेची माहिती अनुजच्या घरच्यांना दिली. त्यानंतर अनुजचे कुटुंबीयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या मुलाला खासगी रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) नेलं असता डॉक्टरांनी अनुजला मृत घोषित केलं आणि क्षणात अनुजच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टर गणेश प्रसाद यांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असू शकतो असं सांगितलं. तर अनुजच्या मृत्यूची माहिती मिळाली असून त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह सीएचसी येथून घरी नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाय त्याच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला असल्याचं कसबा पोलीस ठाण्याचे प्रभारी कमल सिंह यांनी सांगितलं.
मुलांच्या किरकोळ आचाराकडे दुर्लक्ष नको-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तरुण लोकांमध्ये कमी आहार, नियमित शारीरिक हालचाल नसणं चुकीच्या पद्धतीने आणि अचानक केलेला व्यायम यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी तरुणांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. शिवाय मुलांच्या अनियंत्रित हृदयाच्या ठोक्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका असही डॉक्टरांनी सांगितलं.