Class 2 Students Make Bhelpuri In School : शाळांमधील वेगवेगळ्या उपक्रमांतून मुलांना शिकवण्याच्या पद्धतीमुळे अनेक शिक्षक अधिक सक्रिय होत आहेत. यामुळे मुलांमधली सर्जनशीलता वाढू लागते. प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या उपक्रमांतून सहभाग घेणं, रचनात्मक विचार करणे आणि टीमचे महत्त्व, सुसंवाद जाणून घेणं महत्त्वाचं असतं. यातून मुले एकत्र काम कसं करायचं आणि टीम कशी टिकवायची हे शिकतात. आपण हे अचानक का म्हणतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये इयत्ता दुसरीचे विद्यार्थी टीमने भेळपुरी बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १० मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये भेळपुरी बनवण्याची विद्यार्थ्यांची पद्धत आणि शिस्त पाहून थक्क झाले आहेत. भेळपुरी हा मुंबईकरांचा आवडता पदार्थ आहे. नुसतं नाव जरी काढली जिभेवर चव रेंगाळू लागते. बर्याचदा याला ‘बीच स्नॅक’ म्हणून खाल्लं जातं, जे मुंबईच्या चौपाटी किंवा जुहू सारख्या समुद्रकिनारी मिळतेच मिळते.
E
आणखी वाचा : घराच्या छतावर भूत फिरतंय? VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले, अखेर सत्य काय?
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी एका रांगेत उभं राहिलेले आहेत. त्यांच्यासमोरील टेबलवर एक मोठं भांडं ठेवलंय. रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात काही ना काही वस्तू दिसून येतेय. हे सर्व विद्यार्थी एक-एक करून पुढे येतात आणि टेबलवर ठेवलेल्या मोठ्या भांड्यात त्यांच्या हातातील एक-एक पदार्थ टाकतात. कुणाच्या हातात कुरमुरे, कुणाच्या हातात चिरलेले कांदे, तर कुणाच्या हातात फरसाण दिसून येत आहे. एका मुलाने लिंबू पिळले आणि शेवटी एका लहान मुलाने भेळपुरीत थोडे मीठ टाकले. त्याची ही स्टाईल देखील पाहण्यासारखी होती. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ही सुकी भेळ तयार केलेली दिसत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीला चारा दिल्यानंतर मुलगी म्हणाली, “नाच…!” तर पाहा पुढे काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुंबईतला असून लालजी त्रिकमजी एमपीएस इंग्लिश मीडियम स्कूलमधील हे विद्यार्थी आहेत. या व्हिडीओमध्ये शेवटी विद्यार्थ्याने ज्या स्टाईळमध्ये मीठ टाकलंय ती स्टाईल लोकांना फार आवडू लागली आहे. ही स्टाईल पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीय. पण सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत बनवेली ही भेळ मात्र चवदार झाली असणार, यात मात्र शंका नाही.
आणखी वाचा : Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला
हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत असून या व्हिडीओला आतापर्यंत १० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. खासकरून लोक मीठ टाकणाऱ्या विद्यार्थ्याचं कौतूक करताना दिसत आहेत.