क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ. अगदी लहान मुलांपासून जेष्ठ मंडळींपर्यंत क्रिकेटचे वेड सर्वांनाच असते. कोणतीही मॅच असली की क्रिकेटप्रेमी ती आवर्जुन पाहतातच. तसेच कामात कितीही व्यस्त असले तरी विकएन्डला, सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळण्यासाठी थोडा वेळ काढतात. तर काही मुलं, मुली क्रिकेटर होण्याचे ध्येय ठरवून त्याचा सराव लहानपणापासूनच सुरू करतात. त्यांची जिद्द अनेक जणांसाठी प्रेरणादायी ठरते. विशेष कौशल्य असणाऱ्या मुला मुलींचे असे काही व्हिडीओ तुम्ही पहिले असतील. असाच लडाखमधील एका मुलीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील मुलीचे नाव मकसूमा असून, ती सहावी इयत्तेत शिकते. या व्हिडीओमध्ये मकसूमा क्रिकेट खेळताना दिसत आहे. तिची बॅटींग एखाद्या पारंगत खेळाडूप्रमाणे आहे. तिच्या या कौशल्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिने या खेळाचे प्रशिक्षण कसे घेतले आणि तिचा आवडता क्रिकेटर कोण आहे हे विचारल्यावर ती काय म्हणाली पाहा.

Video of women visiting Kaas Plateau going Viral
“बाईपण भारी देवा! इतरांसाठी जगताना स्वत:ला विसरू नका,” कास पठारला भेट देणाऱ्या महिलांचा Video Viral
shocking video : Fire Ignited by Electricity in Flooded Road
“पानी में आग लगी” रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून गाडी…
YouTuber Seema Kanojiya Accident
जीव गेला तरी चालेल, पण Video बनवणारचं! अपघातानंतर डोक्यातून वाहतय रक्त, पण मोबाइल काही सोडला नाही; यूट्यूबरचा धक्कादायक प्रताप
Bengaluru man trolled for attending work meeting on laptop during Durga Puja pandal visit
“हा मूर्खपणा थांबवा”, दुर्गापुजेदरम्यान लॅपटॉपवर मिटिंग करतेय ही व्यक्ती, Viral Video पाहून संतापले नेटकरी
Watch Paraglider captures dog chasing birds on top of the Great Pyramid of Giza
“हे कसं शक्य आहे?”, गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या शिखरावर पोहचला श्वान, पण कसा? पॅराग्लायडरने शेअर केलेला Video Viral
Woman obscene dance video viral on social media is from Madhya Pradesh where police officer and Councilor did obscene act
“टिप टिप बरसा पानी…”, महिलेचा अश्लील डान्स पाहून पोलिसांनी ओतलं अंगावर पाणी तर नगरसेवकाने… VIDEO एकदा पाहाच
Nagpur driver wrote a message on four wheeler vehicle to express fathers gratitude
Video : “…नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील.” नागपूरच्या चालकाने गाडीच्या काचेवर लिहिला अतिशय सुंदर मेसेज
Girlfriend locked her boyfriend in a box family caught him inside box video
बॉयफ्रेंडला भेटायला बोलावणे तरुणीला पडले महागात; घरचे येताच कुठे लपवलं पाहा; VIDEO बघून व्हाल अवाक्
man fed a bunch of bananas to an elephant
Viral Video : मार्केटमध्ये आलेल्या हत्तीला त्याने खाऊ घातली केळी; पाहा हत्तीच्या डोळ्यातील तो आनंद

आणखी वाचा : आजीच्या मृत्यूबद्दलच्या Linkedin पोस्टमुळे बड्या कंपनीचा CEO ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओला आत्तापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “शिक्षक आणि वडील मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करतात. लहानपणापासूनच मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती, अजुनही मी शिकत आहे.” असे तिने सांगितले. तसेच आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता, “विराट कोहली माझा आवडता क्रिकेटर असून मला त्याच्यासारखे बनायचे आहे” असे तिने सांगितले. एवढ्या लहान वयातील खेळाची ही आवड आणि कौशल्य पाहून नेटकऱ्यांनी ‘भविष्यात या मुलीला भारतासाठी खेळताना पाहायचे आहे’ अशी इच्छा कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे.