विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचं दहापैकी एकही डोकं न जळाल्याने पालिकेने थेट कर्मचाऱ्याचं निलंबन केल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील धमतरी पालिकेने ही कारवाई केली आहे. इतकंच नाही, तर चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
रामलीला मैदानातील रावण दहन कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून यामध्ये डोकं सोडून सगळं काही जळाल्याचं दिसत आहे. विजयादशमीला वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी प्रतीक म्हणून देशभरात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं.
धमतरीमध्ये पालिकेकडून रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर पालिकेकडून लिपिक राजेंद्र यादव यांच्यावर निष्काळजीपणा केल्याबद्दल कारवाई केली. आदेशात सांगण्यात आलं आहे की “राजेंद्र यादव यांनी रावणाचा पुतळा बनवताना निष्काळजीपणा केला असून, यामुळे पालिकेची प्रतिमा खराब झाली आहे”.