पुणे पोलिस डेटा आधारित धोरणाद्वारे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा दावा करत असले तरी, प्रत्यक्षात रस्त्यावरील वास्तव मात्र वेगळेच आहे. शहराच्या अनेक भागात दैनंदिन प्रवासी सततच्या वाहतूक कोंडी आणि गैरव्यवस्थापनाबद्दल निराशा व्यक्त करत आहेत, अलीकडील घटनांमुळे वाद पुन्हा निर्माण झाला आहे.
मुंढवा चौकातून एक नवीन उदाहरण समोर आले आहे, जिथे एका रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागली महिला प्रवासी वाहतूक पोलिसांना जाब विचारत आहे. या घटनेटा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला समोर आलेल्या या फुटेजमध्ये त्या महिलेने परिसरातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल आपली निराशा व्यक्त केली आहे. पुण्यातील हजारो लोकांना त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान अशाच प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावे लागत आहे.
व्हिडीओध्ये ती वाहतूक पोलिसांवर स्पष्टपणे संतप्त झालेली दिसत आहे. महिला वाहतूक कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसते, की, “”रस्ते बंद करणे म्हणजे वाहतूक नियोजन नव्हे”. तिने वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीची जबाबदारी घेण्याची आणि चांगले नियोजन करण्याची मागणी केली.
मुंढवा जंक्शनवरील गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अलीकडेच प्रायोगिक तत्वावर वाहतूक वळवण्याचे उपाय सुरू केले आहेत, ज्यामध्ये मुख्य वाहतूक सिग्नल बंद करण्याचा समावेश आहे. पण, या निर्णयावर स्थानिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करून या वाहतूक कोंडी वळवण्याच्या धोरणाला “गोंधळ घालणारे” असे संबोधले.