कपड्यांच्या घड्या घालणे हे काम खूप कंटाळवाणे असते. रोज लहान-मोठे असे सर्व कपडे तीन-चार फोल्ड करीत नीट घड्या घालून मग ते व्यवस्थित कपाटात ठेवायचे. हे काम करण्यासाठी खूप पेशन्स लागतात. अनेकांना कपडे घडी करण्याचा खूप कंटाळा येतो. अशा वेळी ते कपडे घडी न करताच तसेच कपाटात कोंबून ठेवतात. तुम्ही याच प्रकारातले असेल आणि तुम्हालाही रोज कपडे घडी करण्याचा कंटाळा येत असेल, तर या चिमुकल्याचा व्हिडीओ एकदा बघाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यात एक चिमुकला अगदी सोप्या पद्धतीने आणि स्पीडने कपडे कसे घडी करायचे हे दाखवत आहे. त्यात त्याने अवघ्या काही सेकंदांत आपले कपडे (टी-शर्ट, पॅन्ट) घडी केले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अगदी ४-५ वर्षांचा लहान मुलगा कागदी पुठ्ठ्याच्या मदतीने कपडे घडी करतोय. कपड्यांची घडी नीट घालण्यासाठी त्याने कागदी पुठ्ठा एका खास पद्धतीने कापला आहे. तो पुठ्ठ्याच्या मध्यभागी कपडे ठेवायचा आणि पुठ्ठ्याला पकडून तो आजूबाजूने कपडे नीट फोल्ड करायचा. बस्स… एवढं झाल्यानंतर कपड्यांची घडी नीट तयार. या पुठ्ठ्याच्या मदतीने चिमुकला अवघ्या काही सेकंदांत कपडे नीट घडी घालतोय.

हा व्हिडीओ @earthafterparty नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत; तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. हा चिमुकला ज्या पद्धतीने कपड्यांची घडी घालतोय ते पाहून युजर्स त्याचे कौतुक करीत आहेत. कपडे घालण्याची ही अनोखी पद्धत आणि स्पीड यामुळे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.