Viral video: जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तसेच वारा आणि गारपीट झाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. तसेच ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेकडो रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याची माहिती सांगितली जात आहे.त्यामुळे तुम्हीही जर काश्मीरला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर थांबा. काश्मीर येथील प्रसिद्ध डाल लेकवर एक भयंकर अपघात झाला आहे. यामध्ये प्रचंड वाऱ्यामुळे डाल लेकवर पर्यटक असलेली बोट बर्फाच्या पाण्यात उलटी झाली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रचंड वारा सुरु आहे. ढगफुटी झाली आहे आणि डाल लेकवर असलेली बोट जोरजोरात हलत आहे. कोणत्याही क्षणात ही बोट पलटण्याची शक्यता असतानाच, बोटीच्यावर असलेला पत्रा हवेत अडून जातो आणि बोट बर्फाच्या पाण्यात पलटी होते. यावेळी बोटीत असलेले पर्यटक पाण्यात पडतात. यामध्ये काही पर्यटक बचावासाठी ओरडताना दिसत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे पर्यटन स्थळांवर खबरदारी घेऊनच आनंद घेतला पाहिजे.
जर तुम्ही डाल लेकवर राईड घेत असाल तर पुढील खबरदारी नक्की घ्या. जसे की, जोरदार वारा किंवा अस्थिर परिस्थितीत राईड टाळा.प्रत्येक बोटीत सर्व प्रवाशांसाठी पुरेसे लाईफ जॅकेट असल्याची खात्री करा.प्रत्येक राईडमध्ये फक्त २-४ लोक.
पाहा व्हिडीओ
रामबन जिल्ह्यात ढगफुटी आणि अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाच्या परिस्थितीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, काही दुकानं आणि काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. रामबनच्या उपायुक्तांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधनाना सांगितलं की रात्री १.१० वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस दुपारपर्यंत सुरूच होता