देशातील रहिवासी भागात बिबट्या दिसणे सामान्य झाले आहे. बिबट्याला पाहून चांगलाच घाम फुटतो. आतापर्यंत उत्तर भारतातील मैदानी भागात बिबट्या दिसण्याची घटना पाहायला मिळत आहे. मात्र, आता नागालँडच्या ईशान्य भागातील टेकड्यांवर एक विचित्र प्राणी दिसला आहे. जो हुबेहुब बिबट्यासारखा दिसतो. बिबट्या आणि या प्राण्याच्या त्वचेत फरक आहे.
एका इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारत-म्यानमार सीमेवर सुमारे ३७०० मीटर उंचीवर क्लाउडेड बिबट्या (Clouded Leopard)दिसला आहे. हे बऱ्यापैकी मांजरीसारखे दिसते. नागालँडच्या डोंगरात हा धोकादायक बिबट्या दिसल्याचे बोलले जात आहे. संशोधकांनी ठेवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात क्लाउड बिबट्या कैद झाला आहे.
(हे ही वाचा: तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!)
झाडांवर चढण्यात पटाईत
संशोधकांच्या मते, नागालँडमधील स्थानिक समुदाय या जंगलांमधील व्यवस्थापन यंत्रणेवर देखरेख करतात. ही सामुदायिक जंगले वैविध्यपूर्ण आहेत आणि सर्वेक्षणात अनेक धोकादायक प्राणी आहेत, असे त्यांनी सांगितले. संशोधकांनी सांगितले की, ‘हा बिबट्या झाडांवर चढण्यात पटाईत आहे. त्याच्या पायात खूप ताकद आहे. डोळे मिचकावत झाडावर चढतो.’
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
(हे ही वाचा: न्यूटनच्या चौथा लॉ आणि करोनाचा काय संबंध? लहानग्याचा भन्नाट शोध एकदा पाहाचं)
उलटे लटकू शकतात
क्लाउडेड बिबट्याचे पंजे खूप मोठे असतात. ते झाडावर चढण्यासाठी वापरले जातात. हा प्राणी उलटाही लटकू शकतो. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, क्लाउडेड बिबट्या जमिनीवर त्यांची शिकार शोधतात आणि त्यांची शिकार करतात.