तुम्ही आतापर्यंत पांडाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, कारण ते भारतात आढळत नाहीत. ते चीनमध्ये आपल्याला दिसतात. परंतु ते इतर अनेक देशांमध्येही नक्कीच दिसतात. पांडा हा जगातील सर्वात आळशी प्राणी मानला जातो, कारण त्यांचा बहुतेक वेळ बसण्यात, खाण्यात आणि झोपण्यात जातो आणि झोपल्यानंतर ते उठतात. मस्ती करतात. मग त्यांना भूक लागली तरच ते उठतात. सध्या सोशल मीडियावर मस्तीखोर पांडांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, तसाच हा व्हिडीओही खूपच मजेशीर आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयातला दिसत आहे. गुबगुबीत आणि गोंडस पांडा लाकडाच्या ठोकळ्यावर उभा आहे आणि त्याच्या समोर एका लांब दोरीला एक गोणी लटकलेली आहे. हा मस्तीखोर पांडा ती गोणी पकडण्याचा प्रयत्न करत असतो. गोणी त्याच्या जवळ येताच तो पुढे सरकत पकडण्याचा प्रयत्न करतो, पण गोणीला पडण्यासाठी ती जवळ आली असताना त्याचवेळी उडी मारतो खरं…पण त्याचं टायमिंग मात्र चुकतं. त्याने उडी मारेपर्यंत ती गोणी पुढे निघून जाते आणि या नादात पांडा धापकन खाली पडतो. खाली पडल्यानंतर हा पांडा पार जमिनीवर लोळतो. हे दृश्य पाहताना व्यक्ती कोणत्याही मूडमध्ये असला तरी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नासाचे संस्थापक नक्कीच भारतीय असतील! दिवाळीला सिगारेटने रॉकेट उडवण्याची अनोखी स्टाईल एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या मुलाने घराची भिंत नव्हे, वही किंवा कागद नव्हे तर पांढरी शुभ्र कार रंगवली!

हा व्हिडीओ buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की हा प्राणी जंगलात कसा राहिला असेल. तर कुंग फू पांडा चित्रपटाशी जोडताना, एकाने लिहिले की, “हा ड्रॅगन वॉरियर आहे का?” एकाने सांगितले की, अशा प्राण्यांना जंगलात अत्यंत जपून सोडले पाहिजे. कारण जर त्याने झाडावरून अशीच उडी मारली तर त्याचा जीव जाऊ शकला असता. अनेकांनी पांडाचे मजेदार व्हिडीओ शेअर केले आहेत.

Story img Loader