मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ही व्यक्ती पाणीपुरी विक्रेता असून, त्याने शहरातील नागरिकांना १ लाख १ हजार पाणीपुरी मोफत खाऊ घालून आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद व्यक्त केला आणि समाजाला मुलगी वाचवण्याचा संदेश दिला आहे. वर्षभरापूर्वी भोपाळच्या कोलार भागात राहणाऱ्या गुप्ता पाणीपुरी भांडार या नावाने पाणीपुरी विकणाऱ्या आंचल गुप्ता यांनी देखील आपल्या मुलीच्या जन्मानिमित्त लोकांना ५० हजार पाणीपुरी मोफत खाऊ घातल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणीपुरीचे २१ स्टॉल लावले

आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गुप्ता यांनी लोकांना ‘बेटी है तो कल है’ असा संदेश देऊन आनंद व्यक्त केला आणि दिवसभरात एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत खाऊ घातली. त्यासाठी त्यांनी कोलार परिसरातील बंजारी मैदानात ५० मीटर लांबीच्या तंबूत २१ स्टॉल्स लावले होते आणि रोजंदारीवर असलेल्या २५ मुलांना पाणीपुरीचे वाटप करायला लावले. कार्यक्रमस्थळी ‘बेटी वरदान है’, ‘बेटी बचाओ’, ‘बेटी पढाओ’चे बॅनर देखील लावण्यात आले होते. तीन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाच्या मुलीचे वडील गुप्ता यांनी सांगितले की, ते पाणीपुरीची गाडी चालवून महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावतात.

( हे ही वाचा: हा पक्षी निघाला कृष्णाचा भक्त! करतोय ‘हरे कृष्ण’चा जप पहा हा VIRAL VIDEO)

मुलीचा जन्म माझ्यासाठी स्वप्नपूर्ती सारखा आहे

गुप्ता म्हणाले, ‘मुलगीचा जन्म माझ्यासाठी स्वप्नपूर्ती सारखा आहे. मला नेहमीच मुलगी हवी होती. दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला देवाने मला आशीर्वाद म्हणून मुलगी दिली. गुप्ता यांच म्हणणं आहे मुलगी ही घराची लक्ष्मी असते. तिच्यामुळेच घरात समृद्धी येते. मुलगीच संपूर्ण वंशाला चालवते. यामुळेच आता समाजातील लोकांची मानसिकता पूर्णपणे बदलली पाहिजे. आपल्या मुलींना कोणीही ओझे समजू नये.

मुख्यमंत्री शिवराज यांनी दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून गुप्ता यांच्या मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “सदैव सुखी आणि आनंदीत रहा.”

( हे ही वाचा: वराने लग्नात केले असे कृत्य की वधूसोबत नातेवाईकांनाही बसला धक्का; पहा हा VIRAL VIDEO)

गुप्ता यांनी सांगितले की, अनेकांनी त्यांच्या मुलीला भेटवस्तूही दिल्या आहेत. या कार्यक्रमाला क्षेत्राचे आमदार रामेश्वर शर्मा यांनीही हजेरी लावत गुप्ता दाम्पत्याने आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm praises father who distributes 1 lakh panipuri on daughters first birthday gps