-अंकिता देशकर
Karnataka CM Siddaramaiah Video: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेला एक व्हिडिओ दिसला ज्यामध्ये कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री दारूच्या नशेत नाचताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर @Anandi_sanatani ने व्हायरल व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, प्रश्न सुटला आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री बनणार आहेत. आणि डीकेना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागेल.
आम्हाला या व्हिडिओ चा एक दुसरा भाग देखील शेअर होत असल्याचे लक्षात आले.
तपास:
व्हायरल व्हिडिओ मध्ये दोन भाग होते, पहिला भाग स्पष्ट दिसत होता आणि त्यात काही लोक आनंदात एखादा दिवस साजरा करताना दिसत होते. त्यामुळे आम्ही युट्युबवर सर्च करण्यापासून सुरुवात केली. काही किवर्डस वापरून आम्ही आमचा तपास सुरु केला.
या शोधादरम्यान आम्हाला एक व्हिडिओ TV Vikrama National वर अपलोड केलेला सापडला. त्याचे शीर्षक होते: Siddu’s champagne celebration: siddaramaiah is in the party mood.|Siddaramaiah | Tv Vikrama national
youtube.com/watch?v=ojEIT18wlRY
आम्हाला असाच एक व्हिडिओ National TV वर देखील अपलोड केलेला आढळला.
या व्हिडिओ चे शीर्षक होते: Siddaramaiah drinking beer : ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಕುಡಿದು ತೇಲಾಡಿದ ಸಿದ್ದು | party cheers | NationalTV
(भाषांतर: सिद्धू आनंदाने मदमस्त झाले होते)
हे व्हिडिओ सूचित करतात की ते अलीकडील नसून १० महिन्यांपूर्वीचे आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी दारू पिऊन आनंदोत्सव साजरा केला नसल्याचे स्पष्ट झाले.
आम्ही व्हिडिओचा दुसरा भाग तपासायची सुरुवात केली, जिथे दावा केला जात आहे की सिद्धरामय्या हेच दारुच्या नशेत नाचत आहेत.
आम्ही परत किवर्ड सर्च द्वारे आमचा तपास सुरु केला. ‘Siddaramaiah dancing’ असे किवर्ड वापरून आम्ही तपासल्यावर आम्हाला डेक्कन क्रोनिकल मध्ये एक बातमी सापडली, त्याचे शीर्षक होते: या व्हिडिओमध्ये सिद्धरामय्या नाचत आहेत का? नाही, तो टी नरसीपूरचा शेतकरी आहे!
या आर्टिकल मध्ये व्हायरल व्हिडिओ मधील स्क्रीन शॉट्स होते.
या बातमीत लिहले होते: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गावात प्रसिद्ध असलेल्या एका शेतकऱ्याचा सार्वजनिक कार्यक्रमात नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, अनेकांनी त्याला मुख्यमंत्री समजले होते..
हे ही वाचा<< …म्हणून घड्याळ डाव्याच हातात घातले जाते! डिझाईन बदललं तरी ‘हा’ नियम का बदलला नाही?
हे आर्टिकल मार्च १५ , २०१८ रोजी अपलोड करण्यात आले होते.
आम्हाला india.com वर देखील हि रिपोर्ट मार्च 15, 2018 रोजी अपलोड केलेली असल्याचे समजले.
निष्कर्ष: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी नशेत नाचत असल्याचा व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. दोन असंबंधित व्हिडिओ, एक सिद्धरामय्या यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमधला आणि दुसरा त्यांच्यासारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ एकत्र करून शेअर केला जात आहे.