अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 90th Scripps National Spelling Bee स्पर्धेत बाजी मारणाऱ्या भारतीय वंशाची मुलगी अनन्या विनय हिचे जगभरातून कौतुक होत आहे. या १२ वर्षांच्या मुलीला त्यानंतर प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘सीएनएन’ने मुलाखतीचे आमंत्रण दिले होते. पण इथे मात्र तिला भारतीय द्वेषाचा सामना करावा लागला. संस्कृत भाषेवरून सीएएनच्या अँकरने तिची टिंगल उडवली. मुलाखतीदरम्यान अँकर कॅमेरोटाने अनन्याला ‘covfefe ‘शब्दाचे स्पेलिंग विचारले. कदाचित अनेकांना माहिती नसेल की असा कोणाताही शब्द अस्तित्त्वात नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ट्विटमध्ये टायपो एरर झाला, अन् त्याने ‘negative press coverage’ ऐवजी ‘negative press covfefe’ असं टाईप केलं. तेव्हा covfefe हा शब्द अनेकांच्या टिंगलटवाळीच विषय बनला. आता एवढ्याशा अनन्या हे प्रकरण माहिती नव्हतं. तिने covfefe शब्दाचे स्पेलिंग सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यावर अँकरने तिला हा शब्दाचा अर्थ सांगितला.
India vs Pakistan : आता कळलं ना ‘क्रिकेट का किंग कौन?’
‘covfefe’ हा ‘फाल्तू’ शब्द असून, जो कदाचित संस्कृतमधून आला असावा. तसंही तुम्ही लोक संस्कृत रोजच्या व्यवहारात वापरतच असतात तेव्हा मला या शब्दाबद्दल कल्पना नाही’, असा शेरा मारत अनन्याला खिजवण्याचा प्रयत्न तिने केला. तेव्हा अँकर कॅमेरोटावर आता मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. याआधीही तिने संस्कृत भाषेची टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला होता. 90th Scripps National Spelling Bee स्पर्धेत अनन्या जिंकली. या स्पर्धेत नेहमीच भारतीय वंशाच्या मुलांचा पगडा पाहायला मिळतो. या स्पर्धेत अनन्याला भारतीय वंशाचा स्पर्धक रोहन राजीव याची तीव्र स्पर्धा होती. ‘marocain’ या शब्दाचं स्पेलिंग अचूक सांगून तिने या स्पर्धेत बाजी मारली. रोहन आणि अनन्या या दोघांमध्ये २० फेऱ्यांत ही स्पर्धा पार पडली होती . अनन्याने तिला विचारण्यात आलेल्या स्पेलिंगपैकी ३५ शब्दांची स्पेलिंग अचूक सांगत प्रतिष्ठित अशा स्पेलिंग बी स्पर्धेचा किताब पटकावला.
India vs Pakistan champions trophy 2017 : हाय व्होल्टेज सामन्यात ‘जबरा फॅन’ जोडीची चर्चा