सोशल मीडियावर प्राण्यांच्या विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काहीवेळा प्राण्यांची फाईट सुरु असते तर काहीवेळा मस्ती सुरु असते. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर एक साप आणि मांजर, मुंगुस आणि साप, तर अजगर आणि वाघ, अजगर आणि मगर अशा अनेक लढाया पाहिल्या असतील. पण आज जे आम्ही तुम्हाला व्हिडीओ दाखवणार आहोत तो सापांच्याच दोन विषारी जातींमधल्या भयंकर लढाईचा आहे. ही लढाई किंग कोब्रा आणि अजगर या दोन विषारी सापांमधली आहे. त्यांच्या लढाईचा एक खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कोब्रा आणि अजगर एकमेकांना सोडायला तयार नव्हते. या लढाईत नक्की कोण जिंकल आणि कुणाची हवा टाईट झाली, हे पाहण्यासाठी एकदा हा व्हिडीओ नक्की पाहाच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तसा फार जुना आहे. पण हा जुन्हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ गेल्या वर्षी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता आणि त्याला आतापर्यंत ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ४ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये किंग कोब्रा आणि अजगर हे दोन विषारी साप एका पाणथळ जागेवर झुंज देताना दिसून येत आहेत. या खतरनाक लढाईची सुरुवात अजगर करतो. सुरूवातीला कोब्रा पाण्यात पोहत पुढे जात असताना पलीकडून काही फूट लांबीचा अजगर तिथे पोहोचतो आणि तो कोब्रावर हल्ला करण्यास सुरूवात करत. अजगर किंग कोब्राला त्याच्यासोबत झुडपांमधून जवळ असलेल्या गढूळ पाण्यात ओढत नेताना दिसतोय. यात दोघांनी गोंधळ घातल्यानंतर दोघे एकमेकांवर आक्रमकपणे हल्ला करण्यास सुरुवात करतात.
यात कोब्रा कसा तरी आपला जीव वाचवतो आणि तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतो. अजगरानेही त्याचा पाठलाग करत त्याला तोंडाने पकडल्याचं दिसून येतंय. कोब्राला जिवंत गिळण्यासाठी आपल्या शरीराने त्याला पकडून ठेवतो, पण कोब्राही त्याहून अधिक हुशार निघाला. स्वत:वर हल्ला करताच त्याने अजगराच्या अंगावर स्वत:ला गुंडाळून त्याचं तोंड दाबलं. यानंतर व्हिडीओमध्ये जे काही दिसतं ते खूप आश्चर्यकारक आहे.
कधी किंग कोब्रा फुस्कारे मारतो तर कधी अजगर कोब्राचा खात्मा करण्याचा प्रयत्न करतो. अजगर त्याच्यावर सतत हल्ला करतो आणि कोब्राला मधूनच गिळण्याचा प्रयत्न करतो, परंतु यात त्याला यश येत नाही. तो कोब्रा गिळण्यासाठी त्याच्या तोंडाकडे आपलं लक्ष्य केंद्रित करतो, पण बराच वेळ लढा देऊनही त्याला यश मिळत नाही. तुम्ही बघू शकता की, बऱ्याच भांडणानंतर दोघेही शेवटी हार मानतात. या लढाईत अजगराचा हल्ला आणि कोब्राचा तितक्याच ताकदीने दिलेला प्रतिकार यात कुणीच हार मानायला तयार नव्हतं. अखेर हे दोन्ही साप वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. ही रोमांचक लढाई पाहण्यासाठी हा व्हिडीओ एकदा पाहाच.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : हुश्शार अस्वल! घराबाहेर अस्वलाला पाहून महिला म्हणाली, “दार बंद कर”; मग पुढे जे घडलं ते पाहाच…
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
किंग कोब्रा आणि अजगराच्या लढाईचा हा व्हिडीओ यूट्यूबवर nurhidayat hdy नावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ६ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर शेकडो लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. दोन बलाढ्या सापांची ही लढाई पाहताना काळजाचा ठोका एक क्षणासाठी चुकेल. असे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अनेक पाहिले असतीलही पण हा व्हिडीओ खास आहे. कारण अनेक भल्यभल्या प्राण्यांना जिवंत गिळणारा अजगरही यावेळी कोब्रापुढे नमला आहे.
आतापर्यंत तुम्ही सापांमधील भांडणाचे अनेक व्हिडीओ यूट्यूबवर पाहिले असतील. पण सापांच्या या दोन बलाढ्य सापांमधील लढाई पाहण्यासारखी आहे. कोब्रा आणि अजगराची ही लढाई सोशल मीडियावर अनेकांना आकर्षित करत आहे.