आतापर्यंत सापाने बेडकाला गिळल्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. तसंच एका सापाची दुसऱ्या प्राण्यांसोबत झुंज तुम्ही पाहिली असेल. पण एका सापाने दुसऱ्या सापाला गिळल्याची घटना कधी ऐकली आहे का? होय, हे खरंय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, हे मात्र नक्की. एखाद्या चित्रपटातला हा सीन पाहावा असा हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महाकाय भारतीय कोब्रा तब्बल पाच फुटांच्या रसेल वायपर जातीच्या सापाला गिळतोय. महाकाय भारतीय कोब्रा आणि रसेल वायपर या दोघांमध्ये आधी तगडी झुंज झाली. त्यानंतर भारतीय कोब्राने रसेल वायपर जातीच्या सापाला हरवलं आणि अखेर त्याला गिळून घेतलं. किंग कोब्रा साप साधारणतः सासा, छोटे प्राणी, कासवाचे अंडे, सरपटनारे प्राणी आणि अन्य साप खातात. किंग कोब्रा अत्यंत विषारी आणि घातक असतात. ते अतिशय चपळाईने शिकार करतात.
आणखी वाचा : हिमाचलमधील रोहतांग पासवर ‘ये इश्क हाय’वर महिलेचा डान्स,पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : शेतकरी रॅंचो! ‘जुगाड’ गहू कापणी यंत्र तयार केले; पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ वाइल्डलाइफ एसओएस नावाच्या संस्थेने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ही संस्था संपूर्ण भारतातील वन्यजीवांची सुटका आणि पुनर्वसन करते. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. “एपिक लढाईचे साक्षीदार व्हा! भारतीय कोब्रा ते रसेल वायपर वडोदरा इथे सापच सापाला गिळताना दिसला. #गुजरात.” असं या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या कॅप्शननुसार हा व्हिडीओ गुजरातमधल्या वडोदरा इथला आहे. कोब्रा साप आपल्या इतक्याच लांबीचा साप गिळंकृत करू शकतो, यावर सहजासहजी कुणाचाच विश्वास बसणार नाही.
हा प्रकार घडताच लोकांचे या दोन्ही सापांकडे लक्ष गेलं. लोकांनी कोब्राला त्याची शिकार पूर्णपणे गिळू दिली. नंतर त्याला ताब्यात घेऊन निसर्गात सोडून दिलं. भारतीय कोब्रा ही भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि भूतानमध्ये आढळणारी नाजा प्रजातीची एक प्रजाती आहे आणि मोठ्या चार प्रजातींचा सदस्य आहे. हे आता भारतातील वन्यजीव संरक्षण कायदा (1972) अंतर्गत संरक्षित आहे. ते साडेसहा फूट लांब वाढू शकतात आणि उभयचर प्राणी, लहान साप, सरडे आणि प्रौढ सस्तन प्राण्यांची शिकार करू शकतात.
रसेलचा वायपर हा भारतीय उपखंडातील मूळ व्हिपेरिडे समुहातील एक विषारी साप आहे आणि भारतातील चार मोठ्या सापांपैकी एक आहे. ब्रिटानिकाच्या मते, वायपर कमाल १.५ मीटर (५ फूट) उंचीपर्यंत वाढतो आणि त्यावर काळ्या आणि नंतर पांढर्या रंगात लाल-तपकिरी ठिपके असलेल्या तीन ओळींनी चिन्हांकित केले जाते.