Unknown Facts about Coca Cola: कोका कोलाचे नाव आज कोणाला माहीत नाही! ही कंपनी अनेक प्रकारची पेये बनवते. आता देशात उन्हाळा सुरु झाला असताना लोकांमध्ये कोका-कोलाची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण आजही बहुतांश लोकांना याच्याशी संबंधित काही तथ्ये माहीत नाहीत. असे सांगितले जाते की हे पेय एका जखमी सैनिकाने तयार केले होते जो एकेकाळी फार्मसीचे काम करत होता. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कोका-कोलाचा फॉर्म्युला तयार झाला. हा जखमी सैनिक त्याच्या वेदना कमी करण्यासाठी औषधे घेत असे. हळूहळू त्याला अंमली पदार्थांचे व्यसन जडले.

८ मे रोजी अटलांटा येथे १८८६ मध्ये फार्मासिस्ट जॉन पेम्बर्टन यांनी कोका-कोलाची निर्मिती केली होती. पेम्बर्टन हे एक सैनिक होते. मात्र सैन्यात भरती होण्यापूर्वी त्यांनी फार्मसीचे काम केले. सैन्यात असताना त्यांना ड्रग्जचे व्यसन लागले होते. त्यासाठी त्यांनी फार्मसीमध्ये संशोधन सुरू ठेवले. या शिपायाने वर्षानुवर्षे कष्ट केले, पण त्यांना यश मिळाले नाही.

लग्नात वधू-वरामध्ये झालं तुफान भांडण; प्रकरण पोहचलं मारामारीपर्यंत; पाहा Viral Video

मग त्याला एक जोडीदार सापडला – फ्रँक रॉबिन्सन. दोघांनी मिळून केमिकल कंपनी सुरू केली. पेम्बर्टनने इथेही याच पेयावर काम सुरू केले. शेवटी, मे १८८६ मध्ये, पेम्बर्टनने एक पेय तयार केले. त्यात सोडा टाकून त्यांनी लोकांना हे पिण्यास दिले. लोकांना हे पेय खूप आवडले. पेम्बर्टनचा पार्टनर फ्रँकने या पेयाला कोका-कोला असे नाव दिले. या कोका कोलाची सुरुवातीची किंमत ५ सेंट प्रति ग्लास ठेवण्यात आली होती. काही अहवाल असे म्हणतात की कोका-कोला हे डोकेदुखी दूर करण्यासाठी औषध म्हणून तयार करण्यात आले होते.

कोका-कोलाचा फॉर्म्युला पेम्बर्टनकडे फार काळ टिकला नाही. हा फॉर्म्युला १८८७ मध्ये अटलांटा येथील फार्मासिस्ट व्यावसायिक आसा ग्रिग्स कॅन्डलर यांनी २३०० डॉलरच्या किमतीत विकत घेतला. कोका-कोलाचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कॅन्डलर यांना एक कल्पना सुचली. लोकांना या पेयांचे व्यसन लावण्यासाठी त्यांनी या पेयाचे कूपन मोफत वाटले. यानंतर लोकांना या पेयाची इतकी सवय झाली की ते जगभर प्रसिद्ध झाले.

Viral Video : मुलीच्या केसांमध्ये अडकलं सापाचं पिल्लू; पुढे जे झालं ते बघून तुम्हालाही बसेल धक्का

दुसऱ्या महायुद्धात हजारो अमेरिकन सैनिकांना इतर देशांमध्ये पाठवले जात होते. त्या वेळी, कोका-कोलाचे अध्यक्ष रॉबर्ट वुड्रफ यांनी ठरवले की प्रत्येक व्यक्तीला कोका-कोलाची बाटली पाच सेंटमध्ये मिळते, परंतु कंपनी आपल्या वतीने सैनिकांवर पैसे खर्च करेल. या युद्धादरम्यान अमेरिकन सैनिकांनी कोका कोलाचा भरपूर आनंद लुटला. त्यावेळी या पेयाचा संबंध देशभक्तीशीही जोडला गेला.

आज कोका-कोला ही कंपनी जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये अस्तित्वात आहे आणि या देशांमध्ये कंपनीचे ९०० हून अधिक प्लांट्स आहेत. असे म्हटले जाते की कोका-कोला कंपनी ३९०० प्रकारची पेये बनवते. जर एखाद्या माणसाने ही पेये रोज प्यायचे ठरवले तर त्याला यासाठी ९ वर्षे लागतील.

Story img Loader