आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठे बाहेर काही खायला गेलो आणि चुकून त्यामध्ये अगदी लहानशी मुंगी जरी सापडली, तरी अनेक ग्राहक त्या ठिकाणी आरडाओरडा सुरू करतात. मात्र, मुंबई येथे एका ठिकाणी चक्क तुम्ही मागवलेल्या कॉकटेलच्या ग्लासला काळ्या मुंग्यांची सजावट करून दिली जाते. अशा या आगळ्यावेगळ्या पदार्थाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर एका कन्टेन्ट क्रिएटरने शेअर केला आहे. नितीन तिवारी असे या कन्टेन्ट क्रिएटरचे नाव असून तो देशभरात फिरून वेगवेगळ्या ठिकाणच्या खास खाद्यपदार्थांचे व्हिडीओ त्याच्या अकाउंटवरून शेअर करत असतो.

@mr.bartrender या हॅण्डलवरून शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये आपण सुरुवातीला एका बारटेंडरला हे कॉकटेल बनवताना बघू शकतो. नंतर एका ग्लासमध्ये तयार केलेले पेय आणि सजावट म्हणून ग्लासच्या एका बाजूला लावलेल्या काही काळ्या मुंग्या आपण बघू शकतो. या मुंग्या आपल्या नेहमीच्या मुंग्यांपेक्षा थोड्या जाडसर आहेत. यासोबतच, हे पेय पिताना क्रिएटरच्या चेहऱ्यावरील हावभावसुद्धा बघण्यासारखे आहेत. त्याने या मुंग्या खाऊन पाहिल्यानंतर त्या कुरकुरीत लागत आहेत, असेदेखील सांगितले.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
nikki tamboli trolled over bold video
बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया

हेही वाचा : वाह! गरमागरम चिकन निहारी तंदुरी कुलचा!! नुसता व्हिडीओ बघूनच तुमच्या तोंडाला सुटेल पाणी!

खरं तर या मुंग्या केवळ ग्लासच्या बाहेर लावलेल्या आहेत, त्यामुळे ग्लासमधील पेयावर किंवा चवीवर त्याचा काही परिणाम होत नाही. असे असले तरीही, या विचित्र सजावटीबद्दल नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही जण याचे कौतुक करत आहेत, तर काही पूर्ण गोंधळून गेल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून आपण समजू शकतो.

“ग्लासवर लावलेल्या मुंग्या कुरकुरीत लागण्यासाठी त्यांना आधी भाजून घेतले होते का?” असा एकाने प्रश्न केला आहे. त्यावर या क्रिएटरने “बहुतेक असू शकते”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “मी हे पिऊन पाहिले आहे, फारच वेगळा अनुभव होता”, असे दुसऱ्याने सांगितले. तिसऱ्याने, “नाही! अजिबात पिऊन बघणार नाही” असा नकार दर्शवला आहे. “या पेयांमध्ये त्या मुंग्यांचा काहीही उपयोग नाहीये, त्यांना उगाच त्रास देऊ नका”, अशी चौथ्याने प्रतिक्रिया दिलेली आहे.

या कॉकटेलचे नावदेखील त्यांनी ‘द एंट्स’ असे ठेवले आहे. @mr.bartrender अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आजपर्यंत ५ लाख ४४ हजार इतके व्ह्यूज मिळाले आहेत.