Coldplay in Mumbai local: मुंबईत सध्या ‘कोल्ड प्ले’ फिव्हर पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टचे आयोजन नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये १८, १९ व २१ जानेवारी असे तीन दिवस करण्यात आलं होतं. १८ व १९ तारखेचे कॉन्सर्ट सुपरहीट ठरल्याचं पाहायला मिळालं. आता या कॉन्सर्टचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत.‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टसाठी देशभरातील हजारो संगीतप्रेमी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर नवी मुंबईत आले होते.

दरम्यान ‘कोल्ड प्ले’ या बँडच्या या कॉन्सर्टची तिकीट मिळवण्यासाठी अनेजण धडपड करत होते. कित्येकांनी दुप्पट ते तिप्पट अशा चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले. विशेष म्हणजे, बेकायदेशीररित्या चढ्या दराने तिकीटाची विक्री होत असतानाही अनेकजण हे तिकीट खरेदी करण्यासाठी इच्छुक होते. अनेकांना भरमसाठ रक्कम देऊनही तिकीटं मिळाली नाहीत. पण मुंबईत एक वेगळाच प्रकार घडला आहे. कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट पाहायला अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून चाहते आले होते मात्र मुंबईतल्याच काही तरुणांनी कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट संपल्यानंतर थेट मुंबई लोकलमध्ये कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट सुरु केला याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Shocking video in mumbai virar local train women fight video viral on social media spirit of mumbai
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
Ram Gopal Varma convicted in cheque bounce case
राम गोपाल वर्मा यांना कोर्टाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan Attacked
Saif Ali Khan Attacked : तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर…
Father of Saif stabbing accused speaks about missing legal documents after the incident.
Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यानंतर हल्लेखोराचा पहिला फोन कोणाला? वडील म्हणाले, “आमचा मुलगा असा…”

कोल्डप्लेने त्यांच्या “म्युझिक ऑफ द स्फिअर्स” टूरचा मुंबईचा पहिला टप्पा डीवाय पाटील स्टेडियमवर तीन दिवसांच्या संगीतमय प्रदर्शनासह गुंडाळला आणि लाखो चाहत्यांना अविस्मरणीय आठवणी देऊन गेल्या. पण जादू तिथेच संपली नाही – मैफिलीनंतरची चर्चा शहरात पसरली आणि मुंबई लोकल ट्रेनमध्ये अनपेक्षितपणे एक घटना घडली. या व्हिडीओमध्ये उत्साही चाहते लोकलमध्येच मोठ मोठ्यानं गाताना दिसत आहेत. “खरा कोल्डप्ले कॉन्सर्ट म्हणजे घरी परतणारी ट्रेन होती.” असं कॅप्शन व्हिडीओ शेअर करताना युजरने दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडिओला आधीच ४.७ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.नेटकऱ्यांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, “मुंबई लोकलमध्ये हे कोल् प्लेच कॉन्सर्ट आता सुरु आहे मात्र पुढच्या ८ तासांनंतर याच लोकलमध्ये भजन कीर्तन होईल, हेच मुंबई लोकलचे सौंदर्य आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हे संगीताचे सौंदर्य आहे, ते अनपेक्षित मार्गांनी लोकांशी जोडते.”ठ”

Story img Loader