Coldplay Ticket Concert in Abu Dhabi Round Trip Planning : कोल्ड प्ले हा जगभरात नावाजला गेलेला बँड जानेवारी २०२५ मध्ये नवी मुंबईत त्यांचा कार्यक्रम सादर करणार आहे. “म्युझिक ऑफ दी स्फीअर्स वर्ल्ड टूर २०२५” असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर काही मिनिटात सर्व तिकीटं विकली गेली. या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी चाहत्यांनी तब्बल ३ लाखांपर्यंतची रक्कम मोजली. दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमाचं तिकीट मिळालं नसल्याने अनेक चाहते नाराज झाले आहेत. या चाहत्यांकडे कोल्डप्लेचा कार्यक्रम पाहण्याची अजूनही एक संधी आहे. हा बँड मुंबईआधी अबू धाबीमध्ये कार्यक्रम करणार आहे. त्यामुळे त्यांचे भारतीय चाहते या कार्यक्रमाचं तिकीट काढून अबू धाबीला जाऊ शकतात, असे सल्ले समाजमाध्यमांवरून दिले जात आहेत.

बलराम विश्वकर्मा नावाच्या एका तरुणाने सुरू केलेल्या इन्स्टाग्रामवरील मिम पेजवर (andheriwestshitposting) त्याने पोस्ट केली आहे की कोल्ड प्लेच्या तिकीटांची काळ्या बाजारात विक्री होत आहे. त्यामुळे कोल्ड प्लेच्या मुंबईतील कार्यक्रमाची तिकीटं काळ्या बाजारात खरेदी करण्याऐवजी अबू धाबीमधील कार्यक्रमाची तिकीटं खरेदी करायला हवीत, असा सल्ला काही कॉन्टेंट क्रिएटर्सनी दिला आहे. काहींचं म्हणणं आहे की मुंबईकर व भारतातील लोक जेवढे पैसे कोल्ड प्लेच्या मुंबईतील तिकीटांसाठी खर्च करतायत तितक्याच पैशांत ते अबू धाबीला जाऊन, तिथे आयोजित केलेला कार्यक्रम पाहून मुंबईत परत येऊ शकतात. अबू धाबीमध्ये ११ जानेवारी रोजी कोल्ड प्लेचा कार्यक्रम होणार आहे. तर मुंबईत हाच कार्यक्रम १८ जानेवारी रोजी होणार आहे.

Wardha, P M Vishwakarma Yojana, artisans,
देशी कारागिरांना भरभरून प्रतिसाद, तब्बल दहा लाखाची विक्री
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Coldplay tickets, Memes and reels Coldplay,
‘कोल्ड प्ले’च्या तिकिटांवरून समाजमाध्यमांवर मीम्स आणि रिल्सचा पाऊस; क्षणार्धात तिकिटांचे आरक्षण, संकेतस्थळ ठप्प
pune get honor to host annual army day parade in january
पुण्याला मिळणार मोठा मान… जानेवारीमध्ये लष्कराचा महत्त्वाचा कार्यक्रम
There is no anti encroachment team action of the Municipal Corporation against the welcome boards of CIDCO Chairman
सिडको अध्यक्षांच्या स्वागत फलकांनी बेलापूर विद्रूप; महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गप्प
Chandrakant Patil Accident
Chandrakant Patil : पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, यावेळी थेट चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला धडक, मंत्री म्हणाले…
expenses of mukhyamantri ladki bahin yojana program
निधी नियोजनावर प्रश्नचिन्ह, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी निविदेला बगल
Famous painter SH Raza prakriti painting stolen from warehouse of auction house at Bellard Pier Mumbai news
प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

हे ही वाचा >> एक डुलकी, एक अपघात! मुंबई लोकलमध्ये झोप लागताच माणसाचा गेला तोल अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

असं करा प्लॅनिंग

समाजमाध्यमांवरील पोस्टनुसार, कोल्डप्लेच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणऱ्या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी काही चाहत्यांनी तब्बल साडेतीन लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र याहून कमी पैशात लोक विमानाने अबू धाबीला जाऊन, तिथल्या चांगल्या हॉटेलमध्ये राहून, कोल्ड प्लेचा कार्यक्रम पाहून परत मुंबईत येऊ शकतात. विमानाचं दोन्ही बाजूचं तिकीट, व्हिसाची रक्कम, कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाचं तिकीट, अबू धाबीमधील हॉटेलचा खर्च, जेवणाचा खर्च मिळून १.५० लाख रुपयांमध्ये सर्व गोष्टी करता येतील.

हे ही वाचा >> नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच

दोन्ही बाजूच्या विमान तिकीटाचा खर्च – २२,००० रुपये
३ स्टार हॉटेलमध्ये तीन दिवस-दोन रात्री राहण्याचा खर्च – ३५,००० रुपये
जेवणाचा खर्च – २०,००० रुपये
विमानतळावर येण्या-जाण्याचा खर्च – ५,००० रुपये
अबू धाबीत फिरण्यासाठी – १०,००० रुपये
मुंबई विमानतळावर जाण्यासाठी – १,००० रुपये
७२ तास अबू धाबीत राहण्याचा व्हिसा – ३,००० रुपये
कोल्ड प्लेच्या अबू धाबीमधील कार्यक्रमाचं तिकीट – ५०,००० रुपये (mid-tier tickets)
एकूण १,४६,००० रुपये

कोल्डप्लेच्या अबू धाबीमधील कार्यक्रमाच्या तिकीटांची विक्री सुरू करण्यात आली आहे.