Student Caught 19 Feet Python Video Viral : आतापर्यंतचा सर्वात मोठा १९ फुटी अजगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पकडला आहे. या महाकाय अजगराचं वजन ५६.६ किलोग्रॅम आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या फ्लेरीडात राहणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाने सर्वात लांब अजगर पकडून अनेकांचा थरकाप उडवला आहे. ओहियो स्टेट यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हा विशाल अजगर पकडला आहे. यूएस टुडेने दिलेल्या माहितीनुसार, या अजगराचं वजन आणि माप घेण्यासाठी दक्षिण-पश्चिम फ्लोरिडाच्या कंजरवेसीत या सापाला नेण्यात आलं होतं. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये फ्लोरिडामध्ये सर्वात मोठा अजगर आढळला होता. त्या सापाची लांबी १८ फूट आणि ९ इंच होती.
वालेरीद्वारा इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत अजगराला पकडल्यानंतर तो तरुणावर हल्ला करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्या सर्पमित्राने धाडस दाखवून अजगराची मान पकडली आणि त्याच्या हल्ल्यापासून स्वत:चं रक्षण केलं. काही वेळानंतर त्या तरुणाला अजगराला व्यवस्थित पकडण्यात यश येतं आणि रस्त्यावर असलेली काही माणसं त्याला मदत करत असल्यांचही व्हिडीओत दिसत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
या तरुणाने अजगराला पकडल्यानंतर म्हटलं की, “या सापाला पकडणं माझं स्वप्न होतं. गतवर्षी मी आणि माझ्या भावाने एक साप पकडला होता. तो जवळपास १८ फुट लांबीचा होता. या अजगराच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मी आधी त्याची शेपटी पकडली होती आणि त्यानंतर माझ्या एका मित्राने जाळं आणलं आणि त्या सापाचं डोकं खाली करण्याचा प्रयत्न केला. साप पकडताना माझा गोंधळ उडाला होता, मला समजत नव्हतं की मला काय करायचं आहे.”