Viral Video : असं म्हणतात, कॉलेजची दिवसं परत कधीच येत नाही. कॉलेजची मित्र आणि आठवणी आयुष्यभर मनात घर करून राहतात. तुम्हाला तुमचे कॉलेजचे दिवस आठवतात का? सध्या असाच एक कॉलेजच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे कॉलेजचे मित्र किंवा त्यावेळच्या गमती जमती आठवतील. या व्हायरल व्हिडीओमध्ये कॉलेजची मुले एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. कॉलेज संपल्यानंतर शेवटच्या दिवसाचा हा व्हिडीओ असावा. (college students cried last day of college emotional video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही कॉलेजची तरुण मुले बाकावर बसलेली दिसत आहे. प्रत्येकाने कॉलेजचा गणवेश घातला आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आहे. कोणी रुमालनी अश्रु पुसत आहे तर कोणी मित्राच्या कुशीत रडताना दिसत आहे. कोणी भावूक झालेले दिसत आहे तर कोणाच्या डोळ्यांतील अश्रु थांबत नाही. हे मित्र एकमेकांना दिलासा देत आहे. व्हिडीओ पाहून कदाचित तुमचेही अश्रु अनावर होणार. या व्हिडीओवर लोकप्रिय गीत ‘कभी अलविदा ना कह ना’ असे लिहिलेय. व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. असं म्हणतात, मुले रडत नाही आणि ते स्वभावाने भावूक नसतात. पण हा व्हिडीओ पाहून गैरसमज दूर होईल. काही लोकांना व्हिडीओ पाहून त्यांच्या शाळेचा किंवा कॉलेजचा शेवटचा दिवस आठवेल.

हेही वाचा : महाकाय अजगराने महिलेला जिवंत गिळलं, लोकांनी अजगरालाच फाडला अन्…थरारक VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हायरल व्हिडीओ

national_p.g_college या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोण म्हणतात मुले रडत नाही, रडतात आणि आपल्या लोकांसाठी खूप जास्त! सर्वांना खूप सारे प्रेम हृदयापासून हृदयापर्यंत”

हेही वाचा : “विसरू नको रे आई बापाला झिजविली ज्यांनी काया… ” चिमुकल्याचं गाणं ऐकून येईल डोळ्यांत पाणी, व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक असा वेळ येतो जेव्हा मनामध्ये असलेल्या खऱ्या नात्याची ओळख होते” तर एका युजरने लिहिलेय, “शाळेच्या शेवटच्या दिवसाची आठवण करून दिली. मित्रांबरोबर भेटणे होत नाही पण त्यांची आठवण खूप येते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुले त्यांच्यासाठीच रडतात, ज्यांना ते मनापासून मानतात”