Colours of Navratri 2024 : सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात एका विशिष्ट मुहुर्तावर घटस्थापना केली जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान केली जातात. विशेषत: महिला नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान करतात. प्रत्येक रंगाचा अर्थ देवीशी जोडला जातो. प्रत्येक दिवसासाठी एक रंग ठरवला जातो. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा मन प्रफुल्लित करतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकल रेल्वे स्टेशन महिलावर्ग दिसत आहे आणि या सर्व महिला लोकलची वाट बघत उभ्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व महिलांनी पिवळा रंगाचे कपडे परिधान केले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Google Trends
Google Trends

हेही वाचा : ‘साधी भोळी माझी आई…’ ऑफिसमध्ये एअरपॉड्स पोहचवण्यासाठी आईचा जुगाड; लेकीने शेअर केला PHOTO

मुंबई लोकल रेल्वेस्टेशनवर पिवळा रंगाने वेधले सर्वांचे लक्ष

हा व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबई लोकल स्टेशनवरील आहे, या व्हिडीओमध्ये तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिला लोकल ट्रेनची वाट बघताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक दोघी वगळता सर्व महिलांनी पिवळा रंग परिधान केला आहे. कोणी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे तर कोणी पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. कोणी पिवळ्या रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला आहे तर कोणी पिवळ्या रंगाचे टॉप परिधान केले आहे. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाची छटा पसरली आहे, असे दिसते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबई लोकल स्टेशनवर दरदिवशी लोकांची भयानक गर्दी दिसून येते पण आज गर्दीपेक्षा पिवळ्या रंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई Matters™ या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवरात्री दिवस १” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “जीवन रंगीबेरंगी आहे, तुमच्या जीवनात रंग भरल्याने तुम्ही रंगीबेरंगी आणि चैतन्यमय होता.” आणखी एका युजरने लिहिलेय,”याला म्हणतात मुंबईचे चैतन्य” काही युजर्सनी ‘जय माता दी’ च्या घोषणा केल्या आहेत.

हेही वाचा : Navratri 2024: नवरात्रीत गरबा खेळून घाम येतो? मग असा करा गरबा-दांडियासाठी खास ट्रेंडिंग मेकअप

जाणून घ्या, नऊ दिवसाचे नऊ रंग

३ ऑक्टोबर – पिवळा रंग
४ ऑक्टोबर – हिरवा रंग
५ ऑक्टोबर – करडा रंग
६ ऑक्टोबर – केशरी रंग
७ ऑक्टोबर – पांढरा रंग
८ऑक्टोबर – लाल रंग
९ ऑक्टोबर – निळा रंग
१० ऑक्टोबर – गुलाबी रंग
११ ऑक्टोबर – जांभळा रंग