करोना रुग्णसंख्या घटल्याने र्निबध शिथिल करण्यासाठी जनमताचा दबाव आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबाबत विचार करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर अखेर १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मात्र, त्यासाठी दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यादिनापासून सर्वसामान्यांना रेल्वेसेवेची मुभा मिळणार आहे. रेल्वेसेवेसाठी राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर किंवा शहरातील महापालिकांच्या कार्यालयातून क्यूआर कोड मिळविणे आवश्यक असेल. अ‍ॅपवर लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच परवानगी पत्र मिळेल. या वरूनच एका प्रसिद्ध कॉमेडीयन अतुल खत्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कसा आहे नक्की व्हायरल फोटो?

अतुल खत्री हे प्रसिद्ध कॉमेडीयन आहेत. ते त्यांच्या सोशल मीडियावरून सध्या घडणाऱ्या घटनानंवरून विनोदी व्हिडीओ, फोटो, पोस्ट बनवून लोकांचं मनोरंजन करत असतात. काल लोकल ट्रेन बाबत घोषणा झाल्यावर अतुल खत्री यांनी रात्री त्यांच्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला. त्यांनी त्या फोटोमध्ये त्यांच्या कोविड लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा फोटो छापला होता. त्यांनी “काम आणि प्रवास पुन्हा सुरू झाला असल्याने आणि विमानतळ, हॉटेल्स अशा ठिकाणी माझे कोविड प्रमाणपत्र दाखवून कंटाळा आला आहे. म्हणून ही कल्पना तयार केली.” अश्या कॅप्शनसह तो फोटो पोस्ट केला. काही तासातच हा फोटो व्हायरल झाला.

नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिकिया!

या व्हायरल फोटोला १० हजाराच्यावरती लोकांनी लाईक करत पसंती दर्शवली आहे. एक युजर कमेंट करतो, “पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या लोकलने प्रवास करण्यासाठी हे फायदेशीर आहे.” तर दुसऱ्या युजर कमेंट करतो की, “मुंबईकरांनसाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी  ड्रेस कोड” तिसरा म्हणतो की, “फक्त तुम्हालाच अशी युनिक आयडीया सूची शकते.”

काही नेटीझन्सने त्यांच्या या पोस्ट खाली मिम्सही कमेंट केले आहेत.