करोना रुग्णसंख्या घटल्याने र्निबध शिथिल करण्यासाठी जनमताचा दबाव आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबाबत विचार करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर अखेर १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मात्र, त्यासाठी दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यादिनापासून सर्वसामान्यांना रेल्वेसेवेची मुभा मिळणार आहे. रेल्वेसेवेसाठी राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अॅपवर किंवा शहरातील महापालिकांच्या कार्यालयातून क्यूआर कोड मिळविणे आवश्यक असेल. अॅपवर लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच परवानगी पत्र मिळेल. या वरूनच एका प्रसिद्ध कॉमेडीयन अतुल खत्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा