भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन अनेक स्तरातून नाजारी व्यक्त केली जात आहे. दरम्यान कॉमेडियन सलोनी गौरने तिच्या शैलीत कंगनाला त्या विधानातून काय म्हणायचे होते हे सांगितले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला आहे.

काय म्हणाली सलोनी?

कॉमेडियन सलोनी गौर कंगनाच्याच शैलीत तिच्यावर व्हिडीओ बनवत असते. अर्थातच हे व्हिडीओ कॉमेडी असतात. तिच्या या पात्राला तिने कंगना रनआउट असं हटके नाव दिल आहे. यावेळी कांगनाने देशाच्या स्वातंत्र्यवर केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून तिने व्हिडीओ बनवला आहे. त्यात ती बोलते की “१९४७ साली आपल्याला आझादी नाही स्वातंत्र्य मिळालं होत. काय चुकीच बोलले मी? आझादी तर आपल्याला आताही मिळालं नाही. देशातील तरुण वर्ग गोव्याला जाऊ शकतोय का? आधी आम्हला आठ वाजच्या आधी उठून आधी कामावर जायला लागायचे, तेव्हा स्वातंत्र्य नव्हते. २०१४ नंतर कोणतेही काम नाही, आपण झोपू शकतो, हे स्वातंत्र्य आहे.”

( हे ही वाचा: पद्मश्री विजेत्याकडून पंतप्रधानांना खास गिफ्ट; भेट पाहून मोदींच्या चेहऱ्यावर आलं हसू )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

( हे ही वाचा: T20 WC 2021: पाकिस्तानच्या पराभवानंतर छोट्या चाहत्याला अश्रू अनावर; शोएब अख्तरने केला व्हिडीओ शेअर )

या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे. अनेकांनी सलोनीच कौतुक करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. “खूप छान” , “क्लीन बोल्ड”, “खूप मजेशीर”, ” हे खरं आहे” अशा अनेक कमेंट्सने कमेंट सेक्शन भरून गेलं आहे.