देहविक्री किंवा शरीर विक्री करणं हा कूल प्रोफेशन आहे असं म्हणणार्या विदुषी स्वरुपवर लोक चांगलेच संतापले आहेत. X वर एकापाठोपाठ एक पोस्ट करत विदुषीला ट्रोल केलं जातं आहे. वेश्याव्यवसायावर या कॉमेडियनने वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यामुळे तिच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे. स्टँड अप कॉमेडी हा लॉकडाऊनपासून वाढलेला प्रकार आहे. आत्तापर्यंत अनेक कॉमेडियन्सना त्यांच्या वक्तव्यासाठी माफी मागावी लागली आहे. अशात आता विदुषी स्वरुप या कॉमेडियनच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाली ही कॉमेडियन

“मला वेश्याव्यवसाय (prostitution) जगातला सर्वात कूल व्यवसाय वाटतो कारण हा एकच असा व्यवसाय आहे जिथे अनुभवाच्या नावावर काही भेदभाव केला जात नाही. त्यांना फ्रेशर्स हवे असतात. ते ब्लॅकमध्ये कच्च्या कळ्या मागवत आहेत. prostitution हा जगातला असा एक व्यवसाय आहे जिथल्या इंटर्नची कमाई सीईओपेक्षा जास्त आहे. इंटर्नला दुबईच्या शेखासह बिझनेस ट्रीप मिळतात आणि नको असलेला गरोदरपणाही मिळतो. वेश्याव्यवसाय हा जगातला असा व्यवसाय आहे ज्याचे तुम्ही कुठेही स्टार्ट अप उघडू शकता. त्याची गुंतवणूकही शून्य आहे. आता काळाबरोबर वेश्याव्यवसाय सोपा झाला आहे. आमच्यावेळी असं नव्हतं.” असं सगळं ती म्हणताना दिसते आहे. ज्यावरुन आता वाद सुरु झाला आहे.

विदुषीचा व्हिडीओ व्हायरल

विदुषीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विदुषीने वेश्या व्यवसाय आणि इतर व्यवसायांची तुलना केली आहे. तसंच अनेक वादग्रस्त वक्तव्य तिच्या शोमध्ये केली आहेत. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. एका संवेदनशील मुद्द्यावर एक महिला म्हणून विदुषी म्हणून बोलू शकते. यावर अनेकांना विश्वास बसत नाही. अनेकांनी तिच्या व्हिडीओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच तिच्या आई-वडिलांचे संस्कारही काढले आहेत.

विदुषीवर सोशल मीडियावर प्रचंड टीका

मला वाटतं तिला वेश्यांच्या वेदना समजतील अशी आशा आहे असं विकास भारती नावाच्या एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. कच्ची कलिया का ज्यादा डिमांड, वेश्या व्यवसाय कुल प्रोफेशन है म्हणणारी ही मुलगी किती वाया गेलेली आहे हेच दाखवून देते आहे असं आणखी एका युजरने म्हटलं आहे. माणूस तेच बोलतो जे त्याला घरी शिकवलं जातं असंही एका युजरने म्हणत विदुषीवर टीका केली आहे. तर वेश्यांना किती नरक यातना भोगाव्या लागतात हे तुला ठाऊक आहे का? असंही विदुषीला काहींनी विचारलं आहे.